सारा घाट असो की कर्जतचा घाट तो पार करण्यासाठी आधी गाडी कर्जत किंवा कसारा घाटात थोड्यावेळ थांबवली जाते. शेवटच्या डब्याला इंजिन जोडले कि मग ती गाडी घाट चढण्यासाठी सज्ज होते. जवळपास सर्वच लांबपल्य्याच्या गाडयांना इंजिन लावावे लागते. सध्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटणाऱ्या दोन वंदे भारत गाड्यांची चाचणी सुरु आहे. विशेष म्हणजे वंदे भारत गाडी कोणत्याही अतिरीक्त इंजिनाचा आधार न घेता कसारा घाट पार करून गेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टचा भाग असलेली वंदे भारत येत्या १० फेब्रुवारी पासून छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटणार आहे. मुंबई- शिर्डी आणि मुंबई सोलापूर मार्गावर धावणाऱ्या या गाडीचा शुभारंभ १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सध्या या गाडीच्या चाचण्या सुरु आहेत. पुणेकरांसाठी देखील वंदे भारत एक्स्प्रेस १० फेब्रवारीपासून सुरु होणार आहे. त्याच दिवशी या दोन वंदे भारत सुरु होत आहेत.
सोमवारपासून या गाड्यांची चाचणी सुरु आहे. घाट विभागातील चाचणी ही महत्वाची असते. इगतपुरी येथून घाटात वंदे भारताची चाचणी सुरु आहे. घट चढून जाण्यासाठी रेल्वे डब्यांना शेवटी इंजिन जोडतात त्याला बँकर असे म्हणतात. हे बँकर्स सर्व गाडयांना लावले जातात. पण या चाचणीमध्ये वंदे भारत एक्स्प्रेस बँकर न लावता घाट पार करून गेल्याने महत्वाची यशस्वी चाचणी झाली.
हे ही वाचा:
अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप
श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात
पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद
आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला
मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ६.१५ ला सुटेल आणि शिर्डीला दुपारी १२.१० वाजता पोहोचेल. तसेच शिर्डीहून संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसला ११ वाजून १८ मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल. सध्या १० तारखेपर्यंत वंदे भारताच्या २ ते ३ वेळा चाचण्या करण्यात येणार आहेत.