भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस मोठ्या दिमाखात नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान १५ फेब्रुवारी २०१९ रोजी रवाना झाली. अशाच प्रकारची पाचवी ट्रेन म्हैसूर आणि चेन्नई दरम्यान धावते. चौथी ट्रेन दिल्ली ते अंब अंदौरा इथपर्यंत धावते. तिसरी ट्रेन मुंबई ते अहमदाबाद याशिवाय दुसरी वंदे भारत दिल्ली ते कटरा असे अंतर कापते.
ही डौलदार एक्सप्रेस कमी वेळात प्रवाशांच्या पसंतीस उतरली आणि तिची व्याप्ती वाढतच गेली. देशभरातील प्रवास अधिक आरामदायी आणि जलद करण्यासाठी रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस चालवत आहे. भारतीय रेल्वेच्या वेगाने धावणाऱ्या या एक्सप्रेसचा लाभ बरेच प्रवासी घेते आहेत. या वंदे भारत एक्सप्रेसने एकाच महिन्यात रेल्वेच्या तिजोरीत भर घातली आहे. प्रवाशांच्या मनात अधिराज्य मिळवण्याऱ्या या ट्रेनने ९ करोड इतका फायदा करून दिलेला आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस सर्व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी आहे.
हेही वाचा :
देशात यंदा १३ लाख टन हळदीचे उत्पादन होणार
‘बोम्मईंच्या खात्यावरून ट्विट कोणी केलं लवकरचं कळेल’
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मविआचे आंदोलन
वंदे भारत एक्सप्रेस ४०० किलोमीटरचे अंतर जे सामान्य ट्रेन एका दिवसात गाठायची. ती ही ट्रेन अवघ्या चार तासात पूर्ण करत आहे. त्यामुळे सामान्य गाड्यांच्या तुलनेत प्रवास जलद आणि सुखकर आणि आरामदायी असल्यामुळे या ट्रेनला प्राधान्य देत आहेत. ज्या कामासाठी दोन दिवस जावे लागत होते ते काम एका दिवसात पूर्ण करून माघारी परतण्याची सोय या ट्रेनमुळे होत असल्यामुळे वेळेची आणि पैशांची बचत होत आहे.
प्रवाशांमध्ये ही ट्रेन पसंतीस का उतरली
- वंदे भारत ५२ सेकंदात ताशी १०० किमी वेगाने धावू शकते
- हा वेग त्याचा कमाल वेग ताशी २०० किलोमीटर
- सर्व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज
- संपूर्ण एक्सप्रेस वातानुकूलित असून स्वयंचलित गेट्स
- सामान ठेवण्यासाठी रॅक इलईडी डिफ्यूज लाइट्स. जे अनेकदा विमानात वापरले जातात.