व्हॅन बिकच्या झंझावातामुळे वेस्ट इंडिजचे वर्ल्डकप खेळण्याच्या आशा बिकट

मुख्य स्पर्धेत खेळण्याचा आशा अंधुक

व्हॅन बिकच्या झंझावातामुळे वेस्ट इंडिजचे  वर्ल्डकप खेळण्याच्या आशा बिकट

सोमवारी आयसीसी वर्ल्डकप २०२३ पात्रता फेरीत नेदरलँडने सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत कमाल केली. वेस्ट इंडिजने डोंगराएवढे ३७४ धावांचे आव्हान उभारले. प्रत्युतरात नेदरलँडने ३७४ धावा करून हा सामना बरोबरीत आणला. सामना सुपर ओव्हरमध्ये. सुपर ओव्हरमध्ये नेदरलँड्सने आश्चर्यकारक कामगिरी केली. वेस्ट इंडिजचा अनुभवी गोलंदाज जेसन होल्डरच्या षटकात बीकने ३० धावा चोपल्या. या षटकात त्याने तीन चौकार आणि तितकेच षटकार ठोकले. सुपर ओव्हरच्या एका षटकांत व्हॅन बीकने सहा चेंडूत (४, ६, ४, ६, ६, ४) अशा तीस धावा फटकावून काढल्या. हे आव्हान वेस्ट इंडिजला पेलवले नाही. वेस्ट इंडिजने दोन फलंदाज गमावून केवळ ८ धावा केल्या.

सुपर ओव्हरमध्ये नेदरलँडसने कसा खेळ केला पाहूया.

दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडिजला या पराभवामुळे मुख्य स्पर्धेत खेळण्याचा आशा अंधुक झाल्या आहेत. यापूर्वी वेस्ट इंडिज संघाला झिम्बाब्वेने देखील पराभूत केले आहे.

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. चाळीस वर्षापूर्वी २५ जून रोजी वेस्ट इंडिज संघाला पराभूत करून भारताने पहिला वर्ल्डकप जिंकून दबदबा निर्माण केला आणि वेस्ट इंडिजचा दबदबा संपला होता. त्यावेळी वेस्ट इंडिजमध्ये लॉइड, गार्नर, मार्शल, रिचर्ड यासारखे अनेक महान खेळाडू होते. विंडीजच्या भेदक तोफखान्यासमोर जाण्याची कोणत्याच संघातील फलंदाजांची हिम्मत नव्हती. वेस्ट इंडिजबरोबर खेळण्यास इतर संघ अक्षरश: घाबरायचे.  १९७५ आणि १९७९ अशा सलग दोन वेळा विंडिजने विश्व चषकाचे जेतेपद पटकावले. १९८३ साली तिसऱ्यांदा विंडीज विश्व चषक जिंकणार असे वाटत असतानाच भारताने विंडिंजच्या स्वप्नांना सुरुंग लावला.

हेही वाचा :

केसीआर पक्षातल्या ३५ जणांनी धरला काँग्रेसचा हात

पालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अनिल परबांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘बंडाचा उद्देश सरकार उलथवून टाकण्याचा नव्हता’

मणिपूरमध्ये सैनिकांच्या कामात महिलांचा अडथळा

एकेकाळी क्रिकेटवर दबदबा असणाऱ्या वेस्ट इंडिजचा संघ आता मात्र एकेका विजयासाठी झगडतोय. विशेषत: एकदिवसीय क्रिकेटमध्ये विंडीजचा संघ पार तळाला फेकला गेलाय. या मागचे मुख्य कारण म्हणजे विंडीज संघातील अनेक खेळाडू टी२० क्रिकेटवर फोकस करतायत. याचा परिणाम म्हणजे भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्व चषक २०२३ मध्ये विडिंज संघ थेट प्रवेश करुन शकला नाही.

Exit mobile version