समाजसुधारक वाल्मिक कराडची पाच वाइनची दुकाने, प्रत्येक दुकानाचा बाजार भाव ५ कोटीच्या घरात!

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया कागदपत्रे केली सादर

समाजसुधारक वाल्मिक कराडची पाच वाइनची दुकाने, प्रत्येक दुकानाचा बाजार भाव ५ कोटीच्या घरात!

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटी आणि सीबीआयकडून कसून चौकशी, तपास सुरु आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ एसआयटीकडून काल कोर्टात सादर करण्यात आले आहेत. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या वाल्मिक कराडबाबत मोठी माहिती समोर आली आहे. खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीटकरत काही पुरावे सादर केले आहेत. यामध्ये वाल्मिक कराडची पाच वाइनची दुकाने असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच प्रत्येक वाइन दुकानाचा बाजार भाव ५ कोटी इतका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वाल्मिक कराड हे राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. यावरून सध्या राजकारण चांगलच पेटलं असून विरोधक धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. याच दरम्यान, अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पुरावे सादर केले आहे. बीडमधील एकूणच प्रशासकीय कारभारावरही प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

हे ही वाचा : 

इंडोनेशिया BRICS चा नवा सदस्य!

दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्‍बाल मिर्चीची गिरगावमधील कोट्यवधींची मालमत्ता जप्त

नेपाळमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप; दिल्ली, बिहार, सिक्कीममध्ये जाणवले धक्के

बुडत्याचा पाय खोलात

अंजली दमानिया यांनी म्हटले, एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी आले ज्याची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली. पत्रात लिहिले आहे की समाजसुधारक वाल्मिक कराड यांची केज, वडवनी, बीड आणि परळी येथे चार ते पाच वाइन ची दुकाने आहेत. प्रत्येक वाइन दुकानाचा बाजार भाव ५ कोटी इतका आहे.

ही जमीन केज येथे १ कोटी ६९ लाख रुपयाला २९/११/२४ रोजी घेतली आणि ३ दिवसात परवानगी दिली गेली. सात बारा १५ दिवसानंतर होतो पण सगळे कायदे कसे धाब्यावर लावण्यात येतात याचे उदाहरण असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले.

 

Exit mobile version