23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषसामाजिक संदेश देणारा 'व्हॅलिअंट फेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र २०२२' शो

सामाजिक संदेश देणारा ‘व्हॅलिअंट फेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र २०२२’ शो

Google News Follow

Related

व्हॅलिअंट फेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र २०२२ हा आगामी मोठ्या बॅनरचा फॅशन शो आगामी काळात येत असून ऑक्टोबरमध्ये हा शो होणार आहे. या फॅशनसोबत समाजकारणही पाहायला मिळणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या फॅशन शोची माहिती देण्यात आली. या फॅशन शोमध्ये काही स्पर्धकांसह अतिथी डॉ. सागर नटराज (प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक), झोया लोबो (फर्स्ट ट्रान्स जेंडर जर्नालिस्ट) आणि नंदकिशोर निवृत्ती शेवाळे (मोटिव्हेशनल ट्रेनर, ग्रूमर, कास्टिंग डायरेक्टर) भाग घेणार आहेत. इव्हेंट ऑर्गनायझर अंजली साखरे यांनी या शोविषयी पत्रकार परिषदेत सांगितले.

. या फॅशन शोच्या आयोजनात महत्त्वाचा सहभाग असलेले सूरज भोईर हे मैत्री संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितले की, या शोमध्ये सामाजिक संदेश देण्यात येणार आहे. “द कम्युनिटी सिमिलरिटीच्या माध्यमातून प्रत्येकाला त्यांची प्रतिभा दाखवण्याची आणि नेहमीच दुर्लक्षित असलेल्या लोकांना संधी देण्यात येणार आहे. आपण सर्व समान आहोत हाच उदात्त संदेश या व्यासपीठावरून द्यायचा आहे. ट्रान्सजेंडर आणि अनाथ वयोगटातील मुले हे या शोचे आकर्षण असेल. ५ वर्षे ते ७५ वर्षे वयोगट सहभागी होण्यासाठी खुला आहे. नवशिक्यांसाठी प्रथमच हे एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे आणि स्वप्ने साध्य करण्याची संधी आहे. अंजली साखरे या फॅशन जगतात भारत स्तरावरील सौंदर्य स्पर्धेच्या विजेत्या आहेत. व्यवसायाने त्या एक अँकर, मोटिव्हेशनल स्पीकर, एक कवयित्री आणि सांजली मोमेंटो इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या एक महिला उद्योजिका आहेत.

हे ही वाचा:

राहुल नार्वेकरांच्या पाठीशी राजकारणाचा वारसा

‘पारदर्शक पद्धतीने आम्ही राज्याचा कारभार चालवणार’

विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर यांची प्रचंड बहुमताने निवड; राजन साळवींना फक्त १०७ मते

अमरावती हत्या प्रकरणातील सूत्रधार इरफान खान जेरबंद

 

या पत्रकार परिषदेत जिद कदम, दिपाली पाटे, प्रिया जैन, कल्पना स्वामीनाथन आणि ओंकार भालेराव हे सुद्धा उपस्थित होते. या शोची सर्व अपडेट्स आणि शो संबंधित माहिती FACEBOOK आणि INSTA PAGE of ” पाहावं एकदा करून ” वर प्रकाशित केली जाणार आहे. सेल्फ मोटिव्हेशन आणि त्यातूनच इतरांना मोटिव्हेट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा या ग्रुपचा हेतू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा