27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषप्लास्टिक द्या आणि चहा, वडापाव घ्या!

प्लास्टिक द्या आणि चहा, वडापाव घ्या!

Google News Follow

Related

शहरात स्वच्छता राखण्यासाठी आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेने एक वेगळीचकल्पना राबवणार आहे. प्लास्टिक हा पर्यावरणाचा मोठा शत्रू असून याच प्लास्टिकमुळे आता भुकेलेल्यांना अन्न मिळणार आहे. प्लास्टिक बाटल्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी फेकल्या जातात त्यासंदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे. पाच बाटल्यांच्या बदल्यात एक चहा तर दहा बाटल्यांच्या बदल्यात एक वडापाव मिळणार आहे. हा उपक्रम लवकरच सुरू होणार असल्याचे पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले सांगितले.

लोक पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, शितपेयाच्या वापरलेल्या बाटल्या सार्वजनिक टिकाणी फेकत असतात. त्यामुळे शहरात, रस्त्यांवर अस्वच्छता पसरते, प्रदूषण होते. त्यामुळे आता महानगर पालिकेकडून बाटल्या द्या आणि चहा, वडापाव घ्या असा स्तुत्य उपक्रम राबवला जाणार आहे. पाणी आणि शितपेयाच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा केल्यास त्या व्यक्तीला त्याबदल्यात चहा आणि वडापाव दिला जाणार आहे.

प्लास्टिकच्या पाच बाटल्यांवर एक चहा तर १० बाटल्यांवर एक वडापाव मिळणार आहे. या बदल्यात महानगर पालिकडेकडून संबंधित हॉटेल, किरकोळ विक्रेत्याला चहासाठी दहा आणि वडापावसाठी पंधरा रुपये मिळणार आहेत. या उपक्रमात  हातगाडी, किरकोळ विक्रेते, छोटे हॉटेल यांना सहभागी होता येणार असून त्यासाठी त्यांनी महानगर पालिकेत अर्ज करायचा आहे. उपक्रमात सहभागी होण्यासाठी अधिकृत अन्न परवाना आणि त्या ठिकाणी स्वच्छता असणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:

‘हे तर पंजाबमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे लक्षण’

मुंबई पालिकेकडून गृह विलगीकरणासाठी नवी नियमावली जाहीर… वाचा सविस्तर

पंजाबमध्ये मोदींचा ताफा अडवल्याचे महाराष्ट्रात पडसाद

मोदी अडथळा बनलेत…

“कचरा गोळा केला जावा, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जनजागृती व्हावी आणि समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत,” अशी प्रतिक्रिया महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिल्याचे ‘लोकसत्ता’ने म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा