पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आजपासून संपूर्ण देशभरात लस उत्सव साजरा करण्यास प्रारंभ होत आहे. भारताने ८५ दिवसात १० कोटी लोकांना लस दिली असल्याची माहिती पंतप्रधानांच्या संकेतस्थळावरून उपलब्ध झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्वीट केले आहे. नरेंद्र मोदी संकेतस्थळावरून याबाबत चार कलमी कार्यक्रम देखील त्यांनी जाहिर केला आहे.
आज से हम सभी, देशभर में टीका उत्सव की शुरुआत कर रहे हैं। कोरोना के खिलाफ लड़ाई के इस चरण में देशवासियों से मेरे चार आग्रह हैं… https://t.co/8zXZ0bqYgl
— Narendra Modi (@narendramodi) April 11, 2021
हे ही वाचा:
पत्रकाराच्या खुनामुळे ठाकरे सरकारमधील मंत्री अडचणीत?
या कार्यक्रमात ‘इच वन- व्हॅक्सिन वन’ म्हणजे जे लोक अशिक्षित असतील अथवा, वृद्ध असतील किंवा स्वतः जाऊन लस घेऊ शकत नसतील त्यांना सहाय्य करावे. ‘इच वन- ट्रीट वन’ म्हणजे ज्यांच्याकडे संसाधनांची कमतरता आहे त्यांना उपचारासाठी सहाय्य करणे. ‘इच वन- सेव्ह वन’ म्हणजे स्वतः मास्क घालून स्वतःला आणि इतरांना वाचवायचे आहे. तर चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करणे. आपल्या परिवारात, परिसरात जर कोणी कोविड रूग्ण असेल तर मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करून विलग राहणे, स्वतःची चाचणी करून घेणे यासारख्या उपाययोजना करण्याचे मोदींनी सुचवले आहे.
त्याबरोबरच त्यांनी एकाही लसीचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचे देखील आवाहन केले आहे. कोरोना प्रतिबंधक उपयायोजनांची अंमलबजावणी करण्याबद्दल देखील सांगितले आहे. जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घेण्यात आपले यश असल्याचे देखील ते म्हणाले.
मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत लस उत्सवाचे आवाहन केले होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आजपासून ११ एप्रिल पासून लस उत्सव सुरू करण्यात आला आहे आणि १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त या उत्सवाची सांगता होणार आहे.