आता लस ‘यौवनात’

आता लस ‘यौवनात’

भारत सरकारने लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरीकांसाठी लसीकरण खुले केले आहे. देशभरात सातत्याने अनेकांकडून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात यावी यासाठी मागणी करण्यात येत होती.

भारताने लसीकरणाचा तिसरा टप्पा १ एप्रिल रोजी चालू केला होता. त्या अंतर्गत देशातल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरीकांसाठी सरसकट लसीकरण चालू केले होते. मात्र देशात कोरोनाचा कहर वाढू लागल्याने आता लसीकरणाचा परीघ देखील वाढवण्यात आला आहे. परंतु तरीही ४५ वर्षांवरील ज्या व्यक्तींचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

कुराणातील आयती संबंधात न्यायालयीन लढा व वस्तुस्थिती

‘नवाब मलिकांची हकालपट्टी करा’

भारत सरकारकडून ‘सिरम’ आणि ‘भारत बायोटेक’ला अर्थसहाय्य

पुन्हा एकदा संकट काळात संघाची मदत

त्याबरोबरच भारत सरकारने आजच सिरम आणि भारत बायोटेक या दोन्ही लस उत्पादकांसाठी अर्थसहाय्य देखील मंजूर केले. त्यामुळे दोन्ही लस उत्पदकांना त्यांचे उत्पादन वाढवणे शक्य होईल. तिसऱ्या टप्प्यात लसीची किंमत, खरेदी आणि पात्रता याबाबतचे निर्बंध शिथिल करण्याता आले होते, असे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे.

भारताने १६ जानेवारी रोजी लसीकरणाच्या मोहिमेला सुरूवात केली. प्रथम आरोग्य सेवेतील कर्मचारी, आघाडीवरील कर्मचारी, यांना लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरीक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्या नागरीकांना लस देण्यात आली. त्यानंतर सरसकट ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरीकाला लस देण्यात आली.

भारताने कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड सोबतच रशियाच्या स्पुतनिक-५ला देखील परवानगी दिली आहे. त्याबरोबरच भारतीय ट्रायल न घेता थेट लसीला मुभा देण्याचे धोरण देखील भारत सरकारने स्वीकारले आहे.

Exit mobile version