30 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेष२-३ महिन्यात लसींचा प्रश्न सुटणार

२-३ महिन्यात लसींचा प्रश्न सुटणार

Google News Follow

Related

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी भारतीय प्रशासन आग्रही दिसत आहे. किंबहुना त्यासाठी पावलंही उचलण्यात येत आहेत. असं असतानाच आता देशात लसींचा मात्र तुटवडा जाणवू लागला आहे. देशात परदेशी लसींचीही आयात करण्यात येत आहे. असं असलं तरीही देशाच्या लोकसंख्येच्या दृष्टीनं मात्र हा पुरवठाही पूरेसा नाही हेच चित्र स्पष्ट होत आहे. याचदरम्यान, कोवीशिल्ड लस निर्मिती करण्याऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अदर पूनावाला यांनी येत्या २- ३ महिन्यांपर्यंत लसींचा तुटवडा अशाच पद्धतीनं जाणवत राहिल असं सूचक वक्तव्य केलं आहे.

सध्याच्या घडीला एका दिवसाला ६-७ कोटी लसींच्या निर्मितीचा आकडा जुलै महिन्यातच १० कोटींवर पोहोचू शकेल अशी वस्तूस्थितीही त्यांनी मांडली. मागणी कमी असल्यामुळं याआधी कंपनीनं लसींचं प्रमाण वाढवलं नवंहतं. ज्यामुळंच जुलै महिन्यापर्यंत लसींचा तुटवडा हमखास जाणवण्याची चिन्हं आहेत.

‘लसीला पुढे मागणी नव्हती. आम्ही विचारही केला नव्हता की एका वर्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती करावी लागेल’, लंडनमधील फायनान्शियल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पुनावालांनी हे वक्तव्य केलं.

हे ही वाचा:

गोव्यात लॉकडाऊन नाही, मात्र आठ दिवस निर्बंध कायम

ठाकरे सरकारच्या अधिकाऱ्यांकडून रश्मी शुक्लांचा छळ

ममतांच्या पराभवाने कार्यकर्ते पिसाळले, सुवेंदू अधिकारींवर हल्ला

बंगालमध्ये भगव्याचा बोलबाला

संबंधित यंत्रणेला कोविडच्या दुसऱ्या लाटेचा कहर जानेवारी महिन्यापासून अपेक्षितच नव्हता. सर्वांना खरंच वाटत होतं की कोविडच्या संकटाला आपण थोपवू लागलो आहोत, असंही ते या मुलाखतीत म्हणाले. मागील महिन्यात शासनानं सिरमला ३ हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली होती. १८ वर्षांवरील नागरिकांसाठीच्या लसींच्या उत्पादनासाठीही ही तरतूद होती, ही महत्त्वाची माहिती पुनावाला यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा