पुढील महिन्यापासून भारत पुन्हा इतर देशांना कोरोना लसीचे डोस पुरवण्यास सुरुवात करेल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना भारताने ५ मे पासून कोरोनावरील लसींच्या निर्यातीवर बंदी घातली होती.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, वॅक्सिन मैत्री अंतर्गत ऑक्टोबरपासून पुन्हा पुरवठा सुरू केला जाईल. कोवॅक्स कार्यक्रमांतर्गत लसींचा पुरवठा करून भारत वसुधैव कुटुम्बकमचे ध्येय पूर्ण करेल . यामुळे जगाला कोरोनाविरोधात एकत्र लढण्यास मदत होईल.
मांडविया म्हणाले की, पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये देशाला लसीचे ३० कोटी डोस मिळतील. यासह, भारताकडे पुढील ९० दिवसांमध्ये १०० कोटी लसींचा साठा असेल. जर सर्व काही ठीक झाले, तर भारत ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये वॅक्सीन मैत्री अंतर्गत कोव्हॅक्स देशांना लस पुरवण्याच्या स्थितीत असेल.
हे ही वाचा:
शाळकरी मुलंही तालिबानींविरोधात एकवटली
‘हिशेब चुकते करण्यासाठी पोलिसांचा वापर केल्याचे हे परिणाम’
राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी
मशिदीतून पाणी प्यायल्यामुळे पाकिस्तानात हिंदू कुटुंबाला ठेवले कोंडून
केंद्रीय मंत्रालयाने सोमवारी सांगितले की,केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व स्त्रोताद्वारे ७९.५८ कोटींपेक्षा जास्त (७९,५८,७४,३९५) लसींच्या मात्रा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पुरवल्या आहेत आणि १५ लाखापेक्षा जास्त मात्रा (१५,५१,९४०) पुरवठ्याच्या मार्गावर आहेत.याशिवाय लसीच्या ५.४३ कोटी पेक्षा जास्त (५,४३,४३,४९०) शिल्लक असून अशा मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.