कोविडपासून लसीची सुरक्षा लहानग्यांनाही मिळणार?

कोविडपासून लसीची सुरक्षा लहानग्यांनाही मिळणार?

फायझर या कोविड-१९ वरील लसीचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने लहान मुलांसाठीच्या लसीच्या चाचणीला लवकरच सुरूवात करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे कोविडवरील लहान मुलांची लस देखील उपलब्ध होण्याची चिन्हे दिसत आहेत.

जगाला कोविड-१९ ने वेढलेले असताना त्यावरील लसीने आधार दिला आहे. परंतु अजूनही ही लस लहान मुलांसाठी उपलब्ध होऊ शकलेली नाही. फायझर या लस उत्पादक कंपनीने याबाबत संशोधन करून या लसीच्या क्लिनिकल ट्रायलला सुरूवात करणार असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा:

ड्रीम मॉल आगीच्या प्रकरणात गुन्हा दाखल

औरंगजेबाची मराठ्यांवरील पहिली शाही स्वारी- शाईस्ताखान (भाग ६)

क्रिकेटच्या देवालाही कोरोनाची लागण

यासाठी जगभरातील १४४ सहभागींवर चाचण्या घेतल्या जातील. ज्यामुळे लहान मुलांमध्ये कोविड विरोधी प्रतिकारक्षमता तयार होते का हे पाहिले जाईल. याचा अभ्यास करताना, ही प्रतिकारक्षमता ६ महिने ते २ वर्षे; २ वर्षे ते ५ वर्षे आणि ५ वर्षे ते ११ वर्षे; अशा विविध वयोगटातील मुलांमध्ये निर्माण होते का हे पाहिले जाणार आहे. अशाच प्रकारचे संशोधन मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन देखील करत आहे.

फायझर या लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची चाचणी लहान मुलांवर घेणार आहे. त्यासाठी अमेरिका आणि युरोपातील सुमारे साडेचार हजार बालकांचा समावेश असेल. त्यात, काहींना लस दिली जाईल, तर काहींना निरुपद्रवी प्लासिबो दिला जाईल. लस दिल्यानंतर त्या बालकांचा सहा महिन्यांपर्यंत अभ्यास केला जाणार आहे.

Exit mobile version