मुंबईत दोन शिफ्टमध्ये लसीकरण

मुंबईत दोन शिफ्टमध्ये लसीकरण

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३१ मे पर्यंत तीन टप्प्यांत ४० लाख लसीकरणाचे उद्दीष्ट ठेवले आहे.

यासाठी मुंबई महानगरपालिकेने मुंबईत दोन पाळ्यांत म्हणजे सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत आणि दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत लसीकरण करण्याचे धोरण निश्चीत केले आहे. या वेळांमध्ये पालिकेच्या १० केंद्रांवर होणार आहे. आतापर्यंत ११ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत लसीकरण केले जात आहे.

हे ही वाचा:

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात

गॅसमुळे गरम झालेल्या सामान्यांच्या खिशाला किंमत घसरणीचा थंडावा

“रक्ताचा खेळ यापुढे चालणार नाही”- मोदींचा दीदीला इशारा

२४ तास सेवा

मुंबई महानगरपालिकेने १० खासगी रुग्णालयांना दोन शिफ्टमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. त्याबरोबरच सर्व व्यवस्था असलेल्या रुग्णालयांना २४ तास लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. पालिका आणि खासगी अशा १०८ केंद्रांवर लसीकरण चालू आहे. दिवसाला एक लाख लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट मुंबई महानगरपालिकेने ठेवले आहे.

सध्या पालिकेकडे कोरोनाचे दीड लाघ डोस आहेत. गुरुवारी आणखी सवा दोन लाख डोस येणार आहेत. त्यामुळे लसीचा तुटवडा जाणवणार नसल्याचा पालिका प्रशासनाकडून दावा करण्यात आला आहे.

आजपासून देशभरात कोरोनाच्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. या टप्प्यात ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्वांना सरसकट लस देण्यात येणार आहे.

लसीकरणाला सुट्टी नाही

याबरोबरच केंद्र सरकारने देशात सर्व दिवस लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना, लसीकरण सतत चालू राहावे यासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. संपूर्ण एप्रिल महिन्यात एकही सुट्टी न घेता लसीकरण करण्यात यावे असा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये गॅझेटेड सुट्ट्यांच्या दिवशीसुद्धा लसीकरण चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Exit mobile version