लहान मुलांच्या लसीकरण नोंदणीला आजपासून सुरुवात

लहान मुलांच्या लसीकरण नोंदणीला आजपासून सुरुवात

राज्यात कोरोना आणि नवा व्हेरियंट ओमिक्रोन बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशात तिसरी लाट येण्याची चिन्हे असताना नवीन वर्षाच्या सुरुवातीला लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास केंद्र सरकारने मुभा दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून लहान मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी सुरू झाल्याची माहिती दिली आहे.

मांडविया म्हणाले की, येत्या ३ जानेवारीपासून लहान मुलांची लसीकरण मोहीम सुरु होणार आहे. त्यासाठी शनिवार १ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार, राज्यात आजपासून लहान मुलांच्या लसीकरणासाठी नाव नोंदणी सुरु झाली आहे. https://www.cowin.gov.in या वेबसाईटवर जाऊन नाव नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. संपूर्ण देशात लहान मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिलेले आहेत.

तसेच एकाच वेळी एक पेक्षा अनेक आजार असलेल्या आणि फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स यांना बुस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्राने घेतलेला आहे. प्रत्यक्ष लसीकरणाला येत्या सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी शनिवारपासूनच लसीकरण नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात करण्यात आली आहे. १५ ते १८ या वयोगटातील मुलांचे आधारकारर्ड तसेच आधारकार्ड नसेल तर शाळेतील ओळखपत्राच्या मदतीने मुलांचे लसीकरणासाठी नाव नोंदवता येणार आहे.

हे ही वाचा:

नोव्हेंबर महिन्यात भारताने केली तिसऱ्या बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनची यशस्वी चाचणी

कंगना रानौतला न्यायालयाचा धक्का!

समीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द?

सुस्वागतम् २०२२

वेबसाईटवर ऍड मोअर या बटनावर क्लिक करुन एका मोबाईल क्रमांकाच्या मदतीने चार मुलांच्या लसीकरणासाठी नोंद केली जाऊ शकते. त्याशिवाय लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष जाऊनही मुलांच्या नावाची नोंदणी केली जाऊ शकते. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढतच आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रोन बाधितांची संख्या ४५४ वर पोहोचली असून १ जानेवारीच्या माहितीनुसार १५७ रुग्ण ओमिक्रोन संसर्गातून बरे झाले आहेत.

Exit mobile version