आता २४ तास लसीकरण

आता २४ तास लसीकरण

काही राज्यांमध्ये कोरोनाचा वाढता कहर पाहता २४ तास आणि सर्व दिवस लसीकरण चालू करण्याची परवानगी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. त्याबरोबरच लसीकरण आठवड्यातील सर्व दिवस खुले ठेवण्याची देखील परवानगी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या ‘राहुल गांधीगिरीचे पोस्टमॉर्टम’

हॉस्पिटल्स या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांच्यामते वेगवेगळ्या वेळांमुळे गर्दी कमी होईल.

आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट केल्या नुसार लोकांना २४x ७ लस घेता येईल कारण पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांना लोकांच्या आरोग्याची आणि वेळेची काळजी आहे.

अपोलो हॉस्पिटल्सच्या डॉ. अनुपम सिबल यांच्यामते २४x७ लसीकरण चालू ठेवल्याने अनेकांना फायदा होईल. विशेषतः नोकरदार लोकांसाठी ज्यांना पहाटे अथवा रात्रीची वेळ सोयीस्कर आहे त्यांना याचा फायदा होणार आहे.

केंद्रीय मंत्रालय १ मार्चपासून सामान्य लोकांसाठी लसीकरण खुले झाल्यानंतर सहव्याधी असणाऱ्या आणि वृद्ध लोकांसाठी सतत सोयीस्कर करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोविड-१९ लसीकरणाच्या ग्रुपचे अध्यक्ष आर एस शर्मा यांच्या सांगणण्यानुसार सरकार सातत्याने कोविन ऍपमध्ये बदल करत आहे. जास्तीत जास्त लोकांसाठी हे उपयोगी होईल असा प्रयत्न सरकारतर्फे करण्यात येत आहे तसेच भविष्यात लोकांच्या प्रतिसादानुसार यात बदल केले जातील.

महाराष्ट्र, पंजाब, केरळ, कर्नाटक या राज्यांत सातत्याने कोविड-१९चे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Exit mobile version