संपूर्ण जग सध्या कोविडच्या महामारीचा सामना करत आहे. त्यावर लसीकरण हा उपाय असल्याने मोठ्या प्रमाणात लसीकरण जगभरात राबविले जात आहे. भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. भारतात राहणाऱ्या विदेशी नागरीकांच्या लसीकरणाबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतून भारत सध्या सावरत आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असली तरी डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था सतर्क झाली आहे. देशातील नागरिकांचं लसीकरण करण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत. देशात आतापर्यंत जवळपास ५१ कोटीहून अधिक लशीचे डोस वितरीत करण्यात आले आहेत. पण डेल्टा व्हेरिअंटचा धोका लक्षात घेता भारतात राहणाऱ्या विदेशी नागरिकांचं लसीकरण करणंही गरजेचं बनलं आहे.
हे ही वाचा:
भारतात उपलब्ध होणार आणखी एक लस!!
शिवसेना राष्ट्रवादीच्या खुंटीला बांधल्याचे चित्र
चारशे कोटींचे खाशाबांचे स्टेडियम महाराष्ट्रात का नाही?
श्रीरामपूरमध्ये संतापाची लाट; लव्ह जिहादचे जाळे टाकून अल्पवयीन मुलीला पळवले
जगभरातील विविध देशांचे असंख्य नागरिक भारतात वास्तव्य करतात. त्यामुळे या नागरिकांचं लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता परदेशी नागरिकांनाही भारतात लस घेणे शक्य होणार आहे. विदेशी नागरिकांना आता CoWin App द्वारे लसीकरण करता येणार आहे.
Health Ministry has decided to allow foreign nationals residing in India to get registered on CoWin portal to take COVID vaccine. They can use their passport as ID for registration on CoWIN. Once they're registered on this portal, they'll get a slot for vaccination: Govt of India pic.twitter.com/f9djEZTxoE
— ANI (@ANI) August 9, 2021
खरंतर कोविन ॲपवरून लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार क्रमांकाची आवश्यकता होती. पण आता विदेशी नागरिकांना पासपोर्टद्वारे लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना उपलब्धतेनुसार स्लॉट दिला जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात परदेशी नागरिक मोठ्या संख्येनं राहत आहेत. यातील बहुतेक लोकं हे फक्त महानगरांमध्ये राहतात. अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त असल्यानं कोरोना संसर्ग वेगात पसरण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे विदेशी नागरिकांचं देखील लसीकरण होणं गरजेचं आहे.
कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे, देशाने लसीकरणात ५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. देशाला लसीकरणात १० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी ८५ दिवस लागले होते. त्यानंतर पुढील ४५ दिवसांत २० कोटींचा आकडा पार केला होता. तर पुढच्या २९ दिवसांत ३० कोटींचा टप्पा पार केला. त्यानंतर अवघ्या २४ दिवसांत ४० कोटी आणि पुढील २० दिवसांत ५० कोटींचा टप्पा पार केला आहे.