आजपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण

आजपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण

कोरोनाविरुद्धची लढाई अजूनही सुरू असून आजपासून म्हणजेच १६ मार्चपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करून या संदर्भातील माहिती दिली आहे. १२ वर्ष पूर्ण ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कॉर्बेव्हॅक्स (Corbevax) लस देण्यात येणार असून या लसीचे दोन डोस २८ दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “मुलं सुरक्षित तर देश सुरक्षित. १६ मार्चपासून १२ ते १३ आणि १३ ते १४ वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार आहे. त्यासोबतच ६० वर्षांवरील नागरिक आता बूस्टर डोस घेऊ शकणार आहेत.” या वयोगटातील मुलांच्या नातेवाईकांना मुलांना लस देण्यासाठी आणि ६० वर्षांवरील नागरिकांना त्यांनी लस घेण्यासाठी आग्रह केला आहे.

केंद्र सरकारकडून १२ ते १४ या वयोगटातील लहान मुलांसाठी हे लसीकरण सुरू होणार आहे. आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. या गाईडलाईन्स सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत.

देशभरात १२ ते १४ वयोगटातील ७.७४ कोटी मुलं आहेत. यांच्या लसीकरणासाठी  CoWIN ऍपवर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असून ही लस मोफत दिली जाणार आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसला धक्का देत शत्रुघ्न सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल

गांधी कुटुंबाने आता काँग्रेसचे नेतृत्व सोडावे!

पंतप्रधान मोदी म्हणतात की, काश्मीर फाइल्ससारखे चित्रपट बनत राहिले पाहिजेत!

‘या’ कारणासाठी मालदीवने मानले भारताचे आभार!

“आम्ही १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे, कारण त्यांना जास्त धोका आहे. चीन आणि सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. प्रौढ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असले तरी कोणतीही हलगर्जीपणा धोकादायक ठरू शकते,” अशी माहिती कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष आणि लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप यांनी सांगितले.

Exit mobile version