भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांसाठी खुशखबर दिली. शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास पंतप्रधांनानी थेट देशवासियांशी संवाद साधून ही आनंदाची बातमी दिली.
पंतप्रधान मोदी यांनी लसीकरणाबाबत मोठी बातमी देताना देशात लहान मुलांच्या लसीकरणाचा नवा अध्याय येत्या ३ जानेवारीपासून सुरू होत असल्याची घोषणा केली.
पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या घोषणा अशा होत्या-
करोनाच्या या संकटात लहान मुलांच्या आरोग्याबाबत प्रामुख्याने सर्वांना चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे आम्ही त्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नव्या वर्षात सोमवारी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी आम्ही लसीकरणाचे दरवाजे खुले करत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी लहान मुलांसाठी घोषणा केलीच पण फ्रंटलाइन वर्कर्ससाठीही त्यांनी महत्त्वाची घोषणा केली. कोविड योद्धे, हेल्थकेअर वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांच्यामुळे करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी खऱ्या अर्थाने मोठे योगदान दिले होते. आजही हे सगळे फ्रंटलाइन वर्कर्स कोविड रुग्णांना सेवा देत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षित करण्याच्या हेतूने हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्सना १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
खरोखरच नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, कृषि कायदे परत आणण्याबद्दल?
सनी लिओनीचे ‘मधुबन में राधिका नाचे’ गाणे वादात
८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी महाराष्ट्रात लॉकडाऊन
‘त्या’ वक्तव्याबद्दल अजित पवार यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे!
फ्रंटलाइन वर्कर्सप्रमाणेच साठ वर्षांवरील नागरिकांनाही १० जानेवारीपासून त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिसरा डोस देण्यात येईल. या वृद्ध नागरिकांना असलेला धोका लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.
ओमिक्रॉनने सध्या सगळीकडे धुमाकूळ घातला असला आणि भारतात त्याने प्रवेश केला असला तरी कुणीही घाबरून न जाता सतर्कता बाळगत त्याचा सामना करायचा आहे. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून या रोगापासून स्वतःचा बचाव करा, असेही पंतप्रधानांनी आपल्या या संवादात सांगितले. स्वयंशिस्त आणि लसीकरण हीच करोनाविरुद्धच्या लढाईत प्रमुख शस्त्रे आहेत, त्यामुळे कोणतीही ढिलाई नको, अशी विनंती पंतप्रधानांनी नागरिकांनी केली. देशात १६ जानेवारी रोजी लसीकरण सुरू झाल्यानंतर १४१ कोटी डोस दिले गेले आहेत. भारतातील ६१ टक्केपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर ९० टक्के नागरिकांना लसचा किमान एक डोस मिळाला आहे, असेही मोदींनी सांगितले.