देशभरातील मुलांच्या ‘दंड’बैठका आजपासून सुरू

देशभरातील मुलांच्या ‘दंड’बैठका आजपासून सुरू

१५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आज प्रारंभ

नव्या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने लहान मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली. सोमवार ३ जानेवारी पासून लसीकरणाला सुरुवात होणार असून देशातील १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस दिली जाणार आहे. १ जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर कोविन पोर्टलवर रविवार २ जानेवारीपर्यंत ७.२१ लाख मुलांची नोंदणी झाली होती.

लहान मुलांना भारत बायोटेक या कंपनीने बनवलेली कोव्हॅक्सीन ही लस देण्यात येणार आहे. शाळेच्या ओळखपत्राद्वारे मुलांच्या नावाची नोंदणी करता येऊ शकणार आहे. शाळांमध्ये आणि लसीकरण केंद्रांवर लहान मुलांच्या लसीकरणासाठी वेगळी सोय करण्यात आली आहे. पहिला लसीचा डोस घेतल्यावर २८ दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

साकेत गोखलेने वापरलेला क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म अचानक झाला गायब!

…म्हणून गुंड सुरेश पुजारीला हवा होता फिलिपिन्समध्ये आश्रय

सांगली जिल्हा बँकेच्या डायरीतून पडळकरांचे नाव वगळले

जावई समीर खान अडचणीत येताच नवाब मलिक यांची एनसीबी विरोधात पुन्हा बोंबाबोंब

कोरोनसोबतच आता ओमायक्रॉनने साऱ्या जगाची चिंता वाढवली असून रविवार २६ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट जनतेशी संवाद साधत ही बातमी दिली होती. करोनाच्या या संकटात लहान मुलांच्या आरोग्याबाबत प्रामुख्याने सर्वांना चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे आम्ही त्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून नव्या वर्षात सोमवारी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी आम्ही लसीकरणाचे दरवाजे खुले करत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले होते. तसेच कोविड योद्धे, हेल्थकेअर वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवाय साठ वर्षांवरील नागरिकांनाही १० जानेवारीपासून त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिसरा डोस देण्यात येईल, अशा महत्त्वाच्या घोषणा नरेंद्र मोदी यांनी केल्या होत्या.

Exit mobile version