भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशातील काही राज्ये सोडल्यास अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. भारतातील प्रमुख उद्योगसमूह टाटा ग्रुपनं कोरोना लढ्यासाठी १५०० कोटी रुपयांची मदत केलेली आहे.टाटा ग्रुपच्या कंपन्यांमधून ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे टाटा ग्रुपनं क्रायोजेनिक टँकरची आयात देखील केली आहे. टाटा ग्रुपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं लसीकरण करण्यात येत आहे. कोरोनाच्या लढ्यात योगदान देणाऱ्या टाटा ग्रुपला लसीकरण हाच कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्याचा मार्ग आहे, असं वाटत आहे.
टाटा ग्रुपनं परदेशातून ६० क्रायोजेनिक टँकर आयात करण्याचा निर्णय घेतल्याची त्यासोबत ४०० ऑक्सिजन प्लांट उभारण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती टाटा ग्रुपच्या अधिकाऱ्यानं दिली. याद्वारे निर्माण होणारा ऑक्सिजन छोट्या रुग्णालयांमध्ये वापरला जाऊ शकतो. याशिवाय टाटा ग्रुप कोल्ड स्टोरेजची चेन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे कोरोना प्रतिबंधक लसींना विशिष्ट तापमानात ठेवता येईल.
हे ही वाचा:
यश आलं की राज्याचं,अपयश आलं की केंद्राचं
हिमांता बिस्व सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री
पंढरपूर-मंगळवेढ्याचा निकाल राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणार
लसीकरणावरून भारताला शिकवणीची गरज नाही- फ्रेंच राष्ट्राध्यक्ष
टाटा सन्सचे अध्यक्ष बनमाली अग्रवाल यांनी जितक्या वेगानं कोरोना लसीकरण करता येईल, तितक्या वेगात ते करावं असं म्हटलं आहे. जितकं वेगवान लसीकरण होईल तेवढ्या लोकांना सुरक्षित करता येईल. हा सुरक्षित मार्ग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी भारत सरकारनं जग भरातील कोरोना प्रतिबंधक लसींना परवानगी दिली पाहिजे, असंही बनमाली अग्रवाल यांनी म्हटलं आहे. कोरोना लसींसाठी कोल्ड चेनची गरज असते. या दृष्टीनं आम्ही तयारी करत आहोत. सुदैवानं आमच्या ग्रुपकडे वोल्टास सारखी कंपनी आहे, असंही बनवाली अग्रवाल म्हणाले.