लसीकरणापूर्वी निगेटिव्ह टेस्ट आवश्यक
कोरोना लस घेण्याआधी अँटीजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे, असे आदेश पनवेल मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आनंद गोसावी यांनी दिले आहे. त्यामुळे आता पनवेलमधील नागरिकांना कोव्हिड रिपोर्ट निगेटिव्ह असल्यानंतरच लस मिळणार आहे.
पनवेल महानगरपालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही खासगी कोव्हिड लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची अँटीजेन व कोव्हिड आरटीपीसीआर चाचणी करुन ती निगेटिव्ह असल्यास लसीकरण करावे. तर पॉझिटिव्ह आल्यास त्याला पुढील तपासणीसाठी पाठवावे. याबाबतचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व खासगी लसीकरण केंद्र आणि वर्कप्लेस सीव्हीसी ला हे पत्र जारी करुन आदेश देण्यात आले आहेत.
यामुळे आता पनवेल महापालिकेत खासगी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी जाणाऱ्यांना कोव्हिड चाचणी बंधनकारक असणार आहे. जर या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच तुम्हाला लस दिली जाणार आहे.
हे ही वाचा:
निर्बंध हटवा, आम्हाला जगू द्या
भारत- श्रीलंका मालिकेलाही कोरोनाचा फटका
रेल्वेमंत्र्यांनी कर्मचाऱ्याला मिठी का मारली?
‘या’ बँकेचं १००% खासगीकरण होणार
या निर्णयामुळे लसूकरणाच्या गोंधळात वाढ होईल का? असा प्रश्न उद्भवला आहे. राज्यात यापूर्वीच मधेच लसीकरण बंद होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तासंतास लसीकरणासाठी रांगा लागलेल्या दिसत आहेत. आता टेस्टिंगमुळे अधिकच गोंधळात वाढ होईल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे.