‘या’ खासगी रुग्णालयातही आता लस उपलब्ध…

‘या’ खासगी रुग्णालयातही आता लस उपलब्ध…

लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवण्याकरता सरकारने आता खासगी रुग्णालयांना देखील परवानगी दिली आहे. मुंबईतील २९ खासगी रुग्णालयांना आता लसीकरण केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यामुळे लवकरात लवकर लसीकरणाचा दुसरा टप्पा गाठता येणे शक्य होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याविषयी ट्विट करून या २९ रुग्णालयांची यादी प्रसिद्ध केली आहे.

कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत भारताच्या खासगी क्षेत्राने मोठे योगदान दिले आहे. यामध्ये लस निर्मिती करणारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्या आहेतच, शिवाय कोविडच्या टेस्टिंगसाठीदेखील खासगी रुग्णालयांचा मोठा फायदा झाला आहे. सुरवातीला काही काळ केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये टेस्टिंग केलं जात होतं, त्यामुळे त्याचा वेगही कमी होता. परंतु खासगी रुग्णालयांना टेस्टिंगची परवानगी दिल्यानंतर आज भारतासारख्या गरीब देशाने सुद्धा २५ कोटींपेक्षा जास्त टेस्ट केल्या आहेत. यामध्ये खासगी रुग्णालयांचा वाट मोठा आहे.

हे ही वाचा:

कोविड लसीकरण… दिग्गजांनी केला मोदींना सॅल्यूट!

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणि सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. हा दुसरा टप्पा लवकर पूर्ण करण्यासाठीही खासगी क्षेत्राची मोठी मदत होणार आहे. आधार नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स, हेल्थ इन्शूरन्स स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, वोटर आयडी, पॅन कार्ड, बँक/पोस्ट ऑफिस पासबुक, पासपोर्ट, पेन्शन डॉक्युमेंट, सरकारी कर्मचारी असल्यास सर्व्हिस आयडी कार्ड, नॅशनल पोप्युलेशन रजिस्टर अंतर्गत स्मार्ट कार्ड यापैकी कोणतीही माहिती दाखवून लस घेता येईल.

Exit mobile version