परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस द्या

परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस द्या

मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी

मुंबई ग्राहक पंचायतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या एका पत्रात परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. सध्या अनेक विद्यार्थी सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या सत्रासाठी परदेशी जाण्याच्या तयारीत असल्याने त्यांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याने ही विनंती करण्यात आली आहे.

दर वर्षी भारतातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जातात. साधारणपणे ऑगस्टच्या दुसऱ्या आठड्यापर्यंत हे विद्यार्थी प्रस्थान करतात. यावर्षी कोविडमुळे परदेशातील अनेक विद्यापीठांनी त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोविडचे लसीकरण पूर्ण केलेले असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे अशा लक्षावधी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीले आहे.

हे ही वाचा:

आता तरी गृहपाठ करून न्यायालयीन परिक्षेला सामोरे जावे

खान मार्केटमध्ये अवैध ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रकरणात नवनीत कार्लाला जामिन नाहीच

शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने चिंता वाहणाऱ्या मोदी सरकारचे अभिनंदन

कोविशिल्ड पाठोपाठ कोवॅक्सिनचे उत्पादनही पुण्यातच

१२ मे रोजी मुंबई ग्राहक पंचायतीने लिहीलेल्या या पत्रात, जुलैपर्यंत विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस पुर्ण करायचे असल्यास त्यांना आत्ता प्राधान्याने लस घेणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांकडून प्राप्त झालेल्या ऑफर लेटरच्या समोर लस देण्यात यावी असे सुचवले आहे.

हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी सांगितले की, “हजारो विद्यार्थी परदेशात जाण्याची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी लस मिळणं हा चिंतेचा विषय झाला आहे. अमेरिका, ब्रिटन, युरोपातील अनेक विद्यापीठांची हिवाळी सत्रे ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये चालू होतात. आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत आणि अनेक विद्यापीठांना विद्यार्थी तेथे पोहोचण्यापूर्वी त्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे अपेक्षित आहे”

त्याबरोबरच त्यांनी CoWIN (कोविन) मध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी वेगळा गट निर्माण करावा आणि अधिकृत पत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच लस घेण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.

Exit mobile version