व्ही. आर. चौधरी म्हणजेच विवेक चौधरी हे भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख असणार आहेत. मूळचे नांदेडचे असणारे चौधरी यांनी हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्विकारला आहे. भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख आर. के. एस. भदोरिया यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आता चौधरी यांनी हवाई दल प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. भदोरिया यांनी ३० सप्टेंबर रोजी आपला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
१९८२ साली विवेक चौधरी हे हवाई दलात दाखल झाले. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. ते मिग-२९ या लढाऊ विमानाचे पायलट राहिले आहेत. तर आजवरच्या ३९ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्वाच्या कमांड आणि स्टाफच्या नेमणुका देखील केल्या आहेत. तर त्यांनी भारतीय वायू दलाच्या प्रशिक्षण अकादमीमध्ये प्रशिक्षक म्हणूनही कामकाज पहिले आहे. हवाई दलाचे प्रमुख होण्याआधी ते हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत (व्हाइस चीफ ऑफ एअर स्टाफ ) होते.
हे ही वाचा:
‘लोकांना सांगा मी क्रांतिकारी होतो’… सरदार उधम चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
‘डी’ गँगचे कारनामे उघडकीस आणण्यासाठी एनसीबी तत्पर
मुख्य सचिव कुंटे आणि पोलिस महासंचालक संजय पांडेंना सीबीआयचे बोलावणे
त्यांना आजवरच्या त्यांच्या कामगिरीसाठी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यामध्ये परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल, वायू सेना मेडल अशा विविध पुरस्कारांचा समावेश आहे.