देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तरखंडच्या जंगलांमध्ये अग्नितांडव सुरू आहे. गढवाल ते कुमाऊं या भागात हा आगीचा उद्रेक पहायला मिळत आहे. शनिवारी ही आग लागली असून ही आग विझवण्यासाठी उत्तराखंड सरकारकडू शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याच संदर्भात उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह राव यांनी रविवारी एक अतिशय महत्वपूर्ण बैठक बोलावली. या बैठकीत आग नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली
शनिवारी उत्तराखंडमधील जंगलात आग लागली. बघता बघता ही आग ६२ हेक्टरच्या क्षेत्रात पसरली आहे. ही आग रोखण्यासाठी राज्याच्या वन विभागाचे १२,००० अधिकारी कार्यरत आहेत. आत्तापर्यंत या आगीत जवळपास ३७ लाख रूपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे, तर चार नागरिकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा:
मुंबईत लॉकडाऊन लावण्याची शक्यता नाही- किशोरी पेडणेकर
नक्षली हल्ल्यात वीस जवान हुतात्मा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलावली उच्च स्तरीय बैठक
लसीकरणाला प्रोत्सहन देणारे अनोखे उपाय
हे अग्नितांडव रोखण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांच्या उपस्थितीत एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. वीडीयो काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीला राज्यातील मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.
तिरथ सिंह रावत यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे दोन चाॅपर्सची मागणी केल्याची माहिती या बैठकीत दिली. त्यांची ही विनंती मान्य करत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार हवाईदलानेही दोन हेलीकाॅप्टर्स देण्याला सहमती दर्शवली आहे. या चाॅपर्सच्या सहाय्याने रविवारच्या दिवसातच आग विझवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगीतले. या सोबतच केंद्र सरकारकडे एनडीआरएफ आणि सैन्याची मदत पाठवण्याची मागणी केली होती. त्यालाही केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत एनडीआरएफच्या तुकड्यांना उत्तराखंडमध्ये पाठवण्या संदर्भात आदेश देण्यात आले आहेत.
प्रदेश में वनाग्नि की बढ़ती घटनाओं की रोकथाम के लिए केंद्र सरकार द्वारा दो हेलीकाप्टर उपलब्घ कराए गए हैं। एनडीआरएफ की टीमें भी प्रदेश में मदद के लिए आएंगी। केंद्रीय गृहमंत्री जी ने जरूरत के अनुरूप हर सम्भव सहायता का भी भरोसा दिया है। 1/2 pic.twitter.com/XBIY9744Z1
— Tirath Singh Rawat (@TIRATHSRAWAT) April 4, 2021