उत्तर प्रदेशातील हमीरपूर भागात लव्ह जिहादचे एक भयावह प्रकरण समोर आले आहे. बनावट ओळख वापरून एका हिंदू मुलीची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी ९ जून रोजी खलील नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीला अटक केली आहे. खलील याने या तरुणीला त्याचे नाव अनिल असे हिंदू असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याने तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पीडित महिलेने आरोपीविरुद्ध तक्रार केल्यानंतर गेल्या आठवड्यात ही घटना उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेने सांगितले की, आरोपी तिला दोन वर्षांपूर्वी भेटला. त्यानंतर त्याने तिला त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. तसेच, त्याने तिला लग्नाचे आश्वासन देऊन मुलीशी अवैध शारीरिक संबंध ठेवले.
हे ही वाचा:
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ५०० वर्षे जुनी ब्राँझची मूर्ती भारताला परत करणार!
बिहारमधील अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल
इस्रायल-हमास दरम्यान युद्धविरामाचा प्रस्ताव सुरक्षा परिषदेत संमत!
मलावीच्या उपराष्ट्रपतींना घेऊन जाणारे विमान बेपत्ता
आरोपीने स्वत:ला अनिल कुमार असल्याचे दाखवून मुलीवर बलात्कार केला, तिच्यावर अत्याचार केला आणि तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. या पीडितेला आरोपीसोबत राहण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर ती कशीबशी त्याच्या कैदेतून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि तिच्या घरी पोहोचली. नंतर तिला कळले की आरोपी हा मुस्लिम आहे आणि तो आधीच विवाहित आहे. त्यानंतर पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली. यात खलीलने तिच्यावर केलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला. आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले.
नंतर त्याने तिला तिचा गर्भपात करण्यास भाग पाडले आणि जोपर्यंत तिने तिचा धर्म इस्लाम स्वीकारला नाही तोपर्यंत लग्न करण्यास नकार दिला, असा आरोप पीडितेने केला आहे.या प्रकरणी भारतीय दंड संहिता, १८६०च्या कलम ३७६ (२) (एन), ३४२, ३१३, ३२३, ५०६ आणि कलम ३/५ (१) उत्तर प्रदेश बेकायदा धर्म परिवर्तन कायदा, २०२१नुसार पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.