पहिल्याच दिवशी ‘थ्रेड्स’ टीकेचा धनी

त्रुटी आढळल्याने वापरकर्त्यांमध्ये नाराजी

पहिल्याच दिवशी ‘थ्रेड्स’ टीकेचा धनी

ट्विटरला टक्कर देण्यासाठी म्हणून इन्स्टाग्रामने थ्रेड्स हे ऍप लाँच केलं. ट्वीटरला पर्याय म्हणून या ऍपकडे पाहता येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, पहिल्याच दिवशी या अ‍ॅपवर वापरकर्त्यांना अनेक त्रुटी दिसून आल्या आहेत. यासंबंधीचे फोटो वापरकर्त्यांनी ट्वीटरवर पोस्ट करत तक्रारी केल्या आहेत.

इन्स्टाग्रामकडून तयार करण्यात आलेलं थ्रेड्स हे ऍप गुरुवार, ६ जुलै रोजी बाजारात आले. हे ऍप येण्यापूर्वीचं हे ऍप म्हणजे ट्विटरला पर्याय ठरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देखील ११ वर्षांनंतर ट्विट करत इलॉन मस्कला डिवचलं होतं. मात्र, पहिल्याच दिवशी या ऍपमध्ये त्रुटी आढळून आल्याने अनेक वापरकर्त्यांनी पुन्हा ट्विटरकडे पावलं वळवल्याचे चित्र आहे.

अनेक थ्रेड्स वापरकर्त्यांनी त्रुटींचे फोटो आणि व्हिडीओ टाकले आहेत. ऍप सुरू केल्यावर स्क्रीनवर कोणतीच गोष्ट दिसत नसल्याचे लक्षात येत आहे. एका पोस्टवर दुसरी पोस्ट किंवा यूजरनेम ओव्हरलॅप झालेलं दिसत आहे. काही यूजर्सच्या स्क्रीनशॉटमध्ये तर सगळी स्क्रीनच अस्पष्ट दिसत आहे. त्यामुळे लाँचच्या पहिल्याच दिवशी या ऍपवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. थ्रेड्स अनइन्स्टॉल करणार, पुन्हा ट्विटर वापरणार अशा आशयाचे संदेश वापरकर्त्यांनी ताक्ररींसह लिहिले आहेत.

हे ही वाचा:

उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीची पुडी

महायुतीचे सरकार ठाकरे, पवार कुटुंबिय विरहित सरकार

सुप्रिया सुळेंचे भाषण म्हणजे निबंध

‘परसातील साप फुत्कारू लागले आहेत’

काही तासांमध्ये लाखो डाऊनलोड

ऍप लाँच केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच २ दशलक्ष वापरकर्त्यांनी हे ऍप डाऊनलोड केले. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत माहिती दिली आहे. कित्येक सेलिब्रिटींनी देखील या अ‍ॅपवर आपलं खातं उघडलं आहे.

Exit mobile version