आपल्या दैनंदिन जीवनात आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करतो. प्लास्टिक मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे. प्लास्टिक संदर्भात केलेल्या नुकत्याच संशोधनातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संशोधनात, दरवर्षी सर्वसाधारण माणूस हा सरासरी ७४ हजार ते १ लाख २१ हजार इतके सूक्ष्म प्लास्टिकचे कण खातो पितो किंवा श्वासातून शरीरात जाते.
प्लास्टिसारख्या घातक पदार्थांचे भयानक दुष्परिणाम आपल्या शरिरावर होत आहेत. जगभरातील तब्बल ८० टक्के लोकांच्या शरीरातील रक्त प्लास्टिकमुळे दूषित झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या संशोधनात नेदरलँडमधील वेगवेगळ्या वयोगटातील २२ लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी केली. त्यातील १७ जणांच्या रक्तात सूक्ष्म प्लास्टिक आढळून आले आहे. मुख्य म्हणजे एका आठ वर्षाच्या मुलीच्या रक्तातसुद्धा कण आढळले आहेत. ही मुलगी प्लास्टिकच्या खेळण्यांशी खेळायची त्याचा हा परिणाम.
भारतात गेल्या तीन दशकात प्लास्टिकचा वापर वीस पटींनी वाढला आहे. तसे इतर देशांच्या तुलनेत भारत कमीच प्लास्टिकचा वापर करतो मात्र कमी वापरले तरी धोका तर निर्माण होणारच. जेव्हा प्लास्टिकचा धोकादायक आहे कळले तेव्हा १९९९ मध्ये भारतात प्लास्टिकविरोधात पहिला कायदा आला. या कायद्यात २० माय मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंद घातली होती.
हे ही वाचा:
प्रवीण दरेकरांना पुन्हा दोन आठवड्यांचा दिलासा!
नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पाच लाख लोकांनी केला गृहप्रवेश
‘गुन्हेगारी प्रक्रिया विधेयक २०२२’ संसदेत सादर!
मोहित कंबोज यांची मागणी; मशिदींवर बेकायदेशीर भोंगे हटवा!
त्यांनतर २०२२ पर्यंत अनेक प्रकारचे चार नवीन कायदे प्लास्टिक संदर्भात भारतात आले. नुकतेच फेब्रुवारी महिन्यात देशात प्लास्टिकचा कमीतकमी वापर करण्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या.