23 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषउत्तरकाशीमधील बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या बचावकार्यात ड्रोनचा वापर

उत्तरकाशीमधील बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या बचावकार्यात ड्रोनचा वापर

१२ दिवसांपासून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू  

Google News Follow

Related

दिवाळीच्या दिवशी म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी उत्तरकाशीमधील एका बोगद्यात अचानक दरड कोसळून काम करत असलेले ४१ मजूर अडकून पडले. या कामगारांना बाहेर काढण्यात अद्याप यश आलेले नाही. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात निर्माणाधीन सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी विविध यंत्रणांचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मात्र, अद्याप त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही. गेल्या १२ दिवसांपासून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पण, बचावकार्य पूर्ण होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो.

दरम्यान, आता बचावकार्यावेळी बोगद्याच्या आतमध्ये ड्रोन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. यामुळे बोगद्याच्या आत बचाव कार्यादरम्यान कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात याचा आधीच अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी सतत संवाद साधण्यात येत असून त्यांच्यापर्यंत आवश्यक वस्तूही पोहोचवल्या जात आहेत.

यापूर्वी बचावकार्य सुरू असतानाच खोदकाम करणाऱ्या ऑगर मशीनमध्ये बिघाड झाला होता. ही समस्या सोडविण्याचे काम गुरूवार, २३ नोव्हेंबर रोजी रात्रभर सुरू होते. यामुळे गेल्या १५ ते १६ तासांपासून खोदकाम होऊ शकलेले नाही. गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ऑगर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यानंतर ती दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हे ही वाचा:

जम्मू काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या!

ब्रिक्स सदस्यत्वासाठी पाकिस्तानचा अर्ज!

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी संबंध; चार सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी!

मुख्याध्यापकावर १४२ विद्यार्थीनींनी केला लैंगिक छळाचा आरोप!

कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ ६ मीटरचे अंतर खोदकाम बाकी आहे. आता अवघ्या काही तासांत कामगारांची सुटका होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. चिनूक हेलिकॉप्टर लवकरच चिन्यालीसौड विमानतळावर पोहोचणार आहे. श्रमिकांना एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता भासल्यास हे हेलिकॉप्टर मदतीसाठी सज्ज असेल. बोगद्याबाहेर रुग्णवाहिकाही सर्व वैद्यकीय मदतीसाठी सुसज्ज आहे. बचावमोहीम शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा