अमेरिकेकडून भारताला लवकरच होणार लसपुरवठा

अमेरिकेकडून भारताला लवकरच होणार लसपुरवठा

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बायडेन प्रशासनाच्या नवीन लस धोरणाबद्दल माहिती दिली. यामुळे अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि नोव्हाव्हॅक्स लसी आता भारताला पुरवठा करण्यात येणार आहेत. त्यामुळेच आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्डच्या उत्पादनास हातभार लागणार आहे.

अमेरिकेने लस वितरणाचा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये भारतासह जगभरातील काही देशांचा सहभाग आहे. अमेरिका २५ दशलक्ष डोसचे वितरण करणार आहे. व्हाइट हाऊसने पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, ते अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि नोव्हाव्हॅक्स लसींसाठी घटकांच्या निर्यातीवरील निर्बंध हटवणार आहेत, यामुळे एसआयआयला लस उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल.

हे ही वाचा:

अवघ्या महिनाभरात महाराष्ट्राच्या महसुलात २३ टक्के घट

पॅरिसमध्ये विमानात स्फोटकं सापडल्याने खळबळ

ठाकरे सरकारमधील अनलॉक विसंवादाचा दुसरा अंक आज?

सोनियाजी, तुमचे मंत्री सत्तेसाठी लाचार, काका-पुतण्यांपुढे माना डोलावतात

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “थोड्या वेळापूर्वी कमला हॅरिस यांच्याशी बोललो. अमेरिकेच्या जागतिक लस वाटणी धोरणातील भाग म्हणून लस पुरवठा करण्याच्या आश्वासनाचे मी मनापासून कौतुक करतो. मी अमेरिकन सरकारने केलेल्या सर्व सहकार्याबद्दल आभार मानतो.

हॅरिस यांनी मोदी यांना भारतासह इतर देशांना उपलब्ध करुन देण्याच्या अमेरिकेच्या योजनेबद्दल माहिती दिली. अमेरिका आणि भारत यांच्यात लस उत्पादनाच्या क्षेत्रासह आरोग्य पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर या नेत्यांनी चर्चा केली. त्यांनी या महामारीमुळे दीर्घकालीन आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावरही लक्ष कटाक्ष टाकला. अमेरिकेने जारी केलेल्या फॅक्टशीटनुसार अंदाजे २५ दशलक्ष लसमात्रा भारत आणि इतर अनेक आशियाई देशांना पाठविले जातील.

अमेरिकन उत्पादकांना लस पुरवठा करण्याच्या प्राथमिकतेसाठी अमेरिकेने १९५० चा संरक्षण उत्पादन कायदा वापरला आहे. अमेरिकेच्या निर्णयामुळे अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि नोव्हाव्हॅक्स या दोन्ही लस तयार करणार्‍या एसआयआयला जलद उत्पादन वाढवता येईल. सध्या सीरम महिन्याला सुमारे ६५ दशलक्ष लस तयार करत आहे, परंतु उदारीकरण झालेल्या पुरवठा साखळीने, महिन्यात १०० दशलक्षपेक्षा जास्त उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अमेरिकेच्या निर्णयामुळे येत्या काही महिन्यांत भारताची स्वतःची लस उत्पादन करण्याची क्षमताही वाढेल. त्यामुळेच येत्या काही महिन्यांमध्ये वेगवान पद्धतीने भारतामध्ये लसीकरण सुरु होईल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Exit mobile version