अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

फायटर जेटच्या सहाय्याने केले फुग्याला लक्ष्य

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

चीनने हवेत सोडलेल्या हेरगिरी करणाऱ्या फुग्याकडे सगळ्यांची नजर होती. हा फुगा अनेकांसाठी त्रासदायक ठरत होता. शेवटी तो फुटला.

अमेरिकेच्या आकाशात हा फुगा तरंगत होता. त्यावर आता अमेरिकेने कारवाई केली आहे. चीनने म्हटले होते की, या फुग्याचा उपयोग वातावरणातील बदलांची माहिती गोळा करण्यासाठी केला जात आहे. पण चीनची आतापर्यंतची वाटचाल पाहता हा फुगा हेरगिरी करण्यासाठीच वापरला जात असेल अशी शंका घेतली गेली.

शेवटी अमेरिकेने त्यावर कारवाई करत हा फुगा फोडला. त्यावर चीनने संताप व्यक्त केला आहे. आपला हा फुगा फोडून अमेरिकेने योग्य केलेले नाही. अमेरिकेने केलेल्या या कारवाईचा चीनने निषेध केला आहे. हे पाऊल उचलून आंतरराष्ट्रीय नियमांचा भंगही अमेरिकेने केल्याचे चीनने म्हटले आहे. चीन कोणत्याही परिस्थितीत आपल्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटीबद्ध आहे. चीनच्या मंत्रालयाने दावा केला की, या फुग्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका अमेरिकेच्या सैन्याला नव्हता.

हे ही वाचा:

अवैध गर्भपातामुळे औरंगाबाद हादरले

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

दहशतवाद्यांचा हैदराबादवर हल्ला करण्याचा कट , तिघांना अटक

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

पण तिकडे अमेरिकेनेही हा फुगा फोडून चीनला इशारा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून मिळालेल्या परवानगीनंतर हा फुगा फोडण्यात आला आहे. या फुग्याला एफ२२ या फायटर जेटच्या सहाय्याने लक्ष्य करण्यात आले. पेंटागॉनने असेही स्पष्ट केले की, चीन या फुग्याच्या सहाय्याने अमरेकिच्या सेनादलाच्या मुख्यालयाची हेरगिरी करत होता.

गेल्या अनेक दिवसांपासून हा फुगा कुतुहलाचा विषय बनला होता. अमेरिकेतील अणुऊर्जा केंद्राच्या वर हा फुगा दिसला त्यामुळे अधिक चिंता व्यक्त केली गेली. त्यानंतर मात्र त्या फुग्याला उद्ध्वस्त करण्यात आले. आता या फुग्याला फोडण्यात आल्यानंतर त्याचे अवशेष गोळा करून अन्यत्र टाकून देण्याचे काम केले जात आहे.

Exit mobile version