अमेरिकेतील टेक्सासमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वास्तविक, येथील एका महिलेच्या पॅथॉलॉजी रिपोर्टमध्ये ती महिला कॅन्सरने ग्रस्त असल्याचे सांगण्यात आले होते. या अहवालाच्या आधारे महिलेची केमोथेरपी सुरू करण्यात आली होती, मात्र आता या महिलेला कॅन्सर झाला नसल्याचे समोर आले आहे.यामुळे महिला पार गोंधळून गेली असून डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिसा मोंक (३९) असे महिलेचे नाव असून २०२२ मध्ये ती पोटदुखीची तक्रार घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. चाचणी अहवालात किडनी स्टोन असल्याचेही समोर आले, परंतु महिलेची प्लीहा मोठी झाल्याचे आढळून आले. यानंतर गेल्या वर्षी जानेवारीमध्ये महिलेच्या प्लीहावर शस्त्रक्रिया करून अतिरिक्त भाग काढण्यात आला. शस्त्रक्रियेतून काढलेला प्लीहाचा अतिरिक्त भाग तपासणीसाठी पाठवण्यात आला. तीन ठिकाणी पाठवण्यात आलेल्या पॅथॉलॉजी लॅबच्या अहवालात योग्य माहिती मिळू शकली नाही, तेव्हा त्याला चौथ्या लॅबमध्ये पाठवण्यात आले, तेथून कॅन्सरची पुष्टी झाली.
हे ही वाचा:
पतंजलीला फटकारत सर्वोच्च न्यायालयाने माफीनामा फेटाळला
इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या नेत्याचे तीन मुलगे ठार
शुभमन गिल, राशिद खान यांनी साकारला गुजरातचा विजय
त्यानंतर रुग्णालयात महिलेची केमोथेरपी सुरू झाली. पहिल्या केमोथेरपीनंतर महिलेचे सर्व केस गळून पडले आणि दुसऱ्या केमोथेरपीदरम्यान महिलेची त्वचा खराब झाली. एप्रिलमध्ये जेव्हा ही महिला नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेली तेव्हा तिला सांगण्यात आले की, तिला कर्करोग नाही आणि ती ठीक आहे. ही बातमी ऐकून महिलेला आश्चर्य वाटले. रुग्णालयाने अत्यंत निष्काळजीपणा दाखवल्याचे महिलेचे म्हणणे आहे. महिलेने सांगितले की, तिच्या दुसऱ्या केमोथेरपीपूर्वीच लॅबचा रिपोर्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता, पण हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रिपोर्टकडेही पाहिले नाही आणि तिला केमोथेरपी उपचार देण्यात आले.दरम्यान, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेला अतोनात त्रास सहन करावा लागला आहे.