बांगलादेशात दुर्गा पूजेला सुरुवात, अमेरिकेने हिंदूंच्या संरक्षणाचे केले आवाहन!

हिंदूंना अजूनही केल जातंय लक्ष्य

बांगलादेशात दुर्गा पूजेला सुरुवात, अमेरिकेने हिंदूंच्या संरक्षणाचे केले आवाहन!

बांगलादेशात मुहम्मद युनूस यांच्या अध्यक्षतेखाली अंतरिम सरकार स्थापन होवून काही काळ उलटला. मात्र, कट्टरवाद्यांकडून अजूनही अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरु आहे, तशा बातम्या-व्हिडीओ समोर येत आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये हिंदूंना जास्त लक्ष्य करण्यात येत आहे. अशामध्ये आता बांगलादेशात दुर्गा पूजेला सुरुवात झाली आहे. परंतु, तेथील हिंदू भयभीत आहेत. कारण दुर्गा पूजेपूर्वी असंख्य हिंदू मंदिराना धमकीचे पत्र आले आहेत.

अशा परिस्थितीत सरकारने आमचे संरक्षण करावे, अशी मागणी हिंदू करत आहेत. याच दरम्यान, अमेरिकेने मोठे वक्तव्य करत बांगलादेश सरकारला हिंदूंच्या संरक्षणाचे आवाहन केले आहे. अमेरिकेने म्हटले,  बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांचे संरक्षण झालेले पाहायचे आहे, कारण हिंदू त्यांचा सर्वात मोठा सण दुर्गापूजा साजरा करत आहेत.

हे ही वाचा : 

पहिल्या दिवशी १५ हजार मुंबईकरांनी केला मेट्रो- ३ भुयारी मार्गावरून प्रवास

अविवाहित स्त्री वेश्येपेक्षा वेगळी नाही, झाकीर नाईक बरळला

स्त्री शक्तीचा जागर: राष्ट्र सेविका केळकर मावशी

दुर्गेचे सहावे रूप ‘कात्यायनी’ – कात्यायनी शुभं दद्याद् देवी दानवघातिनी

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले आहे. हिंदू समुदायाला दुर्गापूजेदरम्यान इस्लामिक कट्टरपंथीयांकडून निर्माण झालेल्या धोक्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना मॅथ्यू मिलर म्हणाले,  नक्कीच, जगभरातील परिस्थितीप्रमाणेच आम्हाला बांगलादेशातही अल्पसंख्याकांचे हक्क सुरक्षितपणे पहायचे आहेत. दरम्यान, हसीना शेख यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशात मुहम्मद युनूस यांच्या अध्यक्षतेखाली अंतरिम सरकार स्थापन झाले. मात्र, अजूनही काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे.

Exit mobile version