27 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
घरविशेषअदानींवर आरोप करणाऱ्या हिंडेंनबर्गला टाळे!

अदानींवर आरोप करणाऱ्या हिंडेंनबर्गला टाळे!

संस्थापक नेट अँडरसन यांनीच केली घोषणा

Google News Follow

Related

यूएस आधारित शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्ग रिसर्च कंपनी बंद करण्याचा निर्णय त्याचे संस्थापक नेट अँडरसन यांनी केली आहे. त्यांनी एक्सवर घोषणा करत ही कंपनी बंद करत असल्याचा निर्णय जाहीर केला. कंपनी बंद करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत, आम्ही जे काही ठरवलं होतं ते पूर्ण झाल्याने आता आम्ही कंपनी बंद करत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. कंपनी बंद करण्याच्या या निर्णयामागे कोणतीही धमकी किंवा वैयक्तिक मुद्दा नसल्याचे अँडरसन यांनी स्पष्ट केले आहे.

कंपनीचे संस्थापक नेट अँडरसन यांनी लिहिले आहे की, ही कंपनी तयार करण्याचे त्यांचे स्वप्न होते. सुरुवातीला समाधानकारक मार्ग काढणे शक्य होईल की नाही हे माहीत नव्हते. हा पर्याय अजिबात सोपा नव्हता. पण पुढील धोक्यांबद्दल अनभिज्ञ होतो आणि त्याकडे आकर्षित झालो. तसेच अँडरसन म्हणाले की, जेव्हा त्यांनी हे काम सुरू केले, तेव्हा त्यांना पारंपारिक आर्थिक पार्श्वभूमी नसल्यामुळे ते करण्यास सक्षम आहे की नाही याबद्दल त्यांच्या मनात शंका होती. त्यांचे कोणीही नातेवाईक या भागात नव्हते. त्यांचे शिक्षण सरकारी शाळेत झाले आहे. त्यांना योग्य कपडे कसे घालावे हेही समजत नव्हते. पूर्वी बहुतांश नोकऱ्यांमध्ये ते एक चांगला कर्मचारी असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यानंतर त्यांनी हिंडनबर्ग रिसर्च कंपनी सुरू केली. मात्र त्यावेळी त्याच्याकडे पैसे नव्हते. पुढे त्यांनी ११ जणांची टीम तयार केली. त्यांनी फक्त कर्मचाऱ्यांची गरज आहे म्हणून कामावर न ठेवता त्यांची क्षमता पाहिली. तसेच ते सांगतात की, त्यांच्या प्रमाणेच त्यांची टीमही चांगल्या आर्थिक पार्श्वभूमीतून आलेली नाही.

नॉथन अँडरसन पुढे म्हणाले, भ्रष्टाचार, खोटेपणा, गैरव्यवहार यावर आम्ही पुरावे दाखवून प्रहार केले. हे लढे सत्य समोर आणण्यासाठीचे होते. लबाडी, भ्रष्टाचार, नकारात्मकता याचा सुरुवातीचा परिणाम हा प्रभावीच वाटतो, पण सत्याची वाट आम्ही सोडली नाही त्यामुळे ही वाटचाल करु शकलो. आमच्या कामामुळे किमान १०० व्यक्तींच्या विरोधात दिवाणी खटले दाखल झाले आहेत.

हे ही वाचा:

संभल वीजचोरी: खासदार झियाउर रहमान बर्क, १६ मशिदी, दोन मदरशांसह १,४०० एफआयआरची नोंद

घरात शिरलेल्या चोराने अभिनेता सैफ अली खानवर केला चाकू हल्ला

आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा…मोदींनी महायुतीच्या आमदारांना दिला कानमंत्र!

चुकीच्या दाव्यानंतर ‘मेटा’कुटीला येत मागितली भारताची माफी

हिंडनबर्ग रिसर्च कंपनीने त्यांच्या अहवालात २०२३ मध्ये अदाणी समूहावर आरोप केले होते. तेव्हा गौतम अदाणी हे जगातल्या चौथ्या क्रमांकाचे अब्जाधीश होते. या अहवालामुळे भारतासह जगभरात खळबळ उडाली होती. याचे पडसाद अगदी संसदेतही उमटले होते. आता हीच रिसर्च कंपनी बंद करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा