अमेरिकेतले संसद सदस्य फेटरमन आले चक्क हाफ पॅन्टमध्ये !

आवडीचा पोशाख घालण्याची मुभा दिल्याबद्दल आश्चर्य

अमेरिकेतले संसद सदस्य फेटरमन आले चक्क हाफ पॅन्टमध्ये !

यूएस सिनेटने ड्रेस कोड परिधान करण्याची बंधने शिथिल केली आहेत.त्यामुळे आता सिनेटर्सना त्यांचा पोशाख निवडण्याची परवानगी देण्यात आली आहे.पेनसिल्व्हियाचे सिनेटर जॉन फेटरमन यांनी ड्युटीवर जाताना शॉर्ट्स परिधान केल्यावर हा बदल झाला आहे.

वॉशिंग्टन स्टेट सिनेट हे वॉशिंग्टन राज्य विधानमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहात सिनेटने ड्रेस कोड अनिवार्य केले होते. मात्र, नेते चक शूमर (डी-न्यूयॉर्क) यांनी सिनेटच्या सार्जंट-एट-आर्म्सला ड्रेस कोडची अंमलबजावणी थांबविण्याचे निर्देश दिले आहेत, हा बदल पुढील आठवड्यात लागू होणार आहे.याआधी सिनेटर्स व्यावसायिक पोशाखात दिसत होते, आता त्यांना ड्रेस कोडची मुभा मिळाल्याने ते त्यांच्या आवडीनुसार पोशाख परिधान करू शकतात.

पेनसिल्व्हियाचे सिनेटर जॉन फेटरमॅनने ड्युटीवर जाताना शॉर्ट्स परिधान केल्यावर हा बदल झाला आहे. नेते चक शूमर यांनी एका निवेदनात म्हटले की, एक अनौपचारिक ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे,त्यामुळे सिनेटच्या सभागृहात सिनेटर्स आता आपल्या आवडीनुसार कपडे परिधान करू शकतात, तसेच मला जर विचारलात तर मी सूट घालत राहीन , ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा:

नागपूर विमानतळावर ८७ लाखांच्या सोन्यासह दोघांना अटक !

मोदी सरकारच्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठींबा

कॅनडा सरकारचा आगाऊपणा

नव्या संसदेत महिला आरक्षण विधेयक सादर..

पाहायला गेले तर अलीकडच्या काळातील हा मोठा बदल आहे.कारण अनेक दशकांपासून सिनेटर्स हे सूट-अँड-टाय असा गणवेश परिधान करत होते. हा सर्व बदल जॉन फेटरमन मुळेच झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, शुमरने ड्रेस कोडची मुभा दिली आहे ती केवळ १०० सिनेटर्सना लागू होणार आहे, बाकीच्या कर्मचाऱ्यांना मात्र पारंपरिक गणवेशात यावे लागणार आहे.

यावर अनेकांनी विरोध दर्शविला आहे.रॉजर मार्शल कॅन्सस सिनेटर म्हणाले, हा सिनेटमधील दुःखाचा दिवस” ​​आहे तसेच जे लोक फेटरमन आणि शुमरची बाजू घेत आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे.सिनेटर्सना विशिष्ट प्रकारचा गणवेश असला पाहिजे , असेही ते म्हणाले.मेनच्या रिपब्लिकन सिनेटर सुसान कॉलिन्स म्हणाले, अशा प्रकारचे नियम शिथिल करणे म्हणजे हा एक संस्थेचा कमीपणा आहे.तसेच मी सुद्धा उद्या बिकिनी घालून येण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version