इस्रायलला दोन हजारांहून अधिक बॉम्ब, २५ एफ-३५ लढाऊ विमाने देण्यास अमेरिकेची मंजुरी

इस्रायलला दोन हजारांहून अधिक बॉम्ब, २५ एफ-३५ लढाऊ विमाने देण्यास अमेरिकेची मंजुरी

इस्रायल – हमास दरम्यानच्या युद्ध रोखण्यासंदर्भातील संयुक्त राष्ट्रसंघात मांडण्यात आलेल्या ठरावावर नकाराधिकाराचा वापर न केल्याबद्दल इस्रायलने अमेरिकेवर तीव्र नाराजी दर्शवली होती. त्याची भरपाई म्हणून की काय, अमेरिकेच्या बायडेन सरकारने इस्रायलला दोन हजारांहून अधिक बॉम्ब आणि २५ एफ-३५ लढाऊ विमाने देण्यास मंजुरी दिली आहे. वॉशिंग्टन पोस्टने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पेंटागॉन आणि अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलला मिळालेल्या या नव्या शस्त्रास्त्रांमध्ये १८०० एमके८४ २००० पाऊंडहून अधिक बॉम्ब आणि ५०० एमके८२ ५०० पाऊंड बॉम्बचा समावेश आहे.

अमेरिकेकडून त्यांचा दीर्घकाळचा मित्र असलेल्या इस्त्रायलला वार्षिक ३.८ अब्ज डॉलर लष्करी मदत दिली जाते. अमेरिकेकडून इस्रायलला हवाई संरक्षण आणि युद्धसामग्री पाठवली जात आहे, परंतु काही डेमोक्रॅट्स आणि अरब अमेरिकन गटांनी बायडेन प्रशासनाच्या इस्रायलला दिल्या जात असलेल्या या समर्थनावर टीका केली आहे.

गेल्याच वर्षी इस्रायलने अमेरिकेकडे २५ एफ-३५लढाऊ विमानांची मागणी केली होती. ती पूर्ण झाली असून इस्रायलच्या ताफ्यात आता एकूण ७५ लढाऊ विमाने आली आहेत.

हेही वाचा :

बेंगळुरू कॅफे स्फोट; दोन संशयितांची माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर

एनआयएकडून आठ टीएमसी नेत्यांना समन्स

बेंगळुरूला हरवून कोलकाता दुसऱ्या स्थानी; चेन्नई अव्वल

अतिकनंतर मुख्तार अन्सारीचाही तुरुंगात मृत्यू; दोघांमध्ये गुन्ह्यांचेही साम्य आणि मृत्यूतही

आतापर्यंत अमेरिकेकडून इस्रायलला ५७ कोटी ३० लाख डॉलरच्या शस्त्रांस्त्रांची विक्री करण्यात आली आहे. इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत अमेरिकेने इस्रायलला नोव्हेंबरमध्ये ३२ कोटी अमेरिकी डॉलर किमतीचे बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि १० कोटी ६०लाख डॉलर किमतीचे तोफगोळे दिले होते. त्याशिवाय, १४ कोटी ७५ लाख डॉलर किमतीचे १५५ मिमी आकाराचे तोफगोळे बनवण्यासाठी फ्युजसह अन्य सामग्री दिली होती. आता पुन्हा एकदा इस्रायलला अमेरिका अब्जावधी डॉलर किमतीची लढाऊ विमाने आणि स्फोटके विकणार आहे.

Exit mobile version