24 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरविशेषटेक्सासमध्ये भगवान हनुमानाची ९० फूट उंची मूर्ती स्थापन !

टेक्सासमध्ये भगवान हनुमानाची ९० फूट उंची मूर्ती स्थापन !

स्टॅच्यू ऑफ द युनियन वेबसाइटनुसार, अमेरिकेतील तिसरी सर्वात उंच प्रतिमा

Google News Follow

Related

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टनमध्ये रविवारी (१८ ऑगस्ट) भगवान हनुमानाच्या ९० फूट उंच मूर्तीचे अनावरण करण्यात आले. भगवान हनुमानाच्या या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. विशेष म्हणजे भगवान हनुमानाची ही मूर्ती अमेरिकेतील सर्वात उंच तिसऱ्या क्रमांकाची मूर्ती असल्याचे सांगितले जात आहे. भगवान राम आणि माता सीता यांना एकत्र आणण्यात भगवान हनुमानाची भूमिका लक्षात घेऊन या पुतळ्याला ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ असे नाव देण्यात आले आहे.

ही मूर्ती टेक्सासमधील शुगर लँड परिसरात असलेल्या श्री अष्टलक्ष्मी मंदिराच्या आवारात स्थापित करण्यात आली आहे. हनुमानाची मूर्ती बनवून मंदिरात बसवण्यामागे चिन्नजीयार स्वामीजींची दूरदृष्टी होती. ‘स्टॅच्यू ऑफ द युनियन वेबसाइट’नुसार, हा पुतळा (मूर्ती) अमेरिकेतील तिसरा सर्वात उंच पुतळा आहे.

मूर्तीच्या अभिषेक प्रसंगी हेलिकॉप्टरमधून प्रभूंच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेबसाइटनुसार, स्टॅच्यू ऑफ युनियनला अध्यात्माचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न आहे, जिथे मनाला शांती मिळते आणि आत्म्यांना निर्वाणाच्या मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. यूएसस्थित हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘भगवान हनुमानाने भगवान रामाच्या सेवेदरम्यान वेग, सामर्थ्य, धैर्य आणि बुद्धिमत्ता यासह अनेक अतुलनीय क्षमता प्रदर्शित केल्या आहेत.

हे ही वाचा :

बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार…!

ओरडणार, बोंबलणार आणि शांत बसणार…

बांगलादेश : हिंदूंच्या रक्षणासाठी स्वतंत्र उपजिल्हा आणि बाजारपेठांची मागणी !

अजमेर सामूहिक बलात्कारप्रकरणी ६ जणांना जन्मठेप

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा