प्रतागडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजखानाच्या कबरीशेजारील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच हटवले. त्यानंतर आता महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी जोर धरतेय. अशातच लोहगड किल्ल्यावर होणाऱ्या उरुसाला परवानगी नाकारण्यात आली आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर आता लोहगडावर उरूस साजरा करण्यास परवानगी नाकारली आहे.
त्यामुळे लोहगड किल्ला परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ५ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत लोहगड आणि घेरेवाडी परिसरात कलम १४४ नुसार जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. किल्यावरील उरूसाला नाकारलेली परवानगी आणि आणि ही दर्गा अनधिकृत असल्याने इथे उरुस भरू देणार नाही असे सांगत बजरंग दलासह इतर संघटनांनी इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने १४४ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :
उत्तर भारतीय जनतेच्या द्वेषावर काँग्रेस फोफावली; आदित्यनाथांच्या भेटीवरून राजकारण
योगी आदित्यनाथ यांच्या भेटीमुळे मविआ नेत्यांची पोटदुखी वाढली
पोस्टरवरच्या अंगप्रदर्शनाला आक्षेप घेणारा महिला आयोग उर्फीबाबत गप्प?
शुक्रवार, ६ जानेवारीला लोहगडावर हाजी हजरत उमरशावली बाबासा उरूस भरणार होता. या उरूसासाठी पुरातत्व विभागाकडे परवानगी मागितली होती. मात्र, ती नाकरली आहे. लोहगडावरील दर्गा आणि मजारी यांचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. प्रतापगडाप्रमाणे इथलेही अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करावे, असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे, असे कलम १४४ ची नोटीस काढताना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी नमूद केलेले आहे.
याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सूचना दिल्या आहेत. व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्टवरुन वाद होतील अशा पोस्टवर बंदी घातल्याच्या सूचना दिल्या आहेत. उरुस झाला तर वाद निर्माण होईल त्यातून राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे उरुसाला परवानगी नाकारली आहे आणि १४४ लागू केले आहे.