उर्फी म्हणते, कोणी घर देता का घर ..

मुंबईत भाड्याचे घर मिळणेही दुरापास्त

उर्फी म्हणते, कोणी घर देता का घर ..

उर्फीचा नंगानाच महाराष्ट्रात चालू देणार नाही अशी भूमिका घेत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मॉडेल उर्फी जावेदच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्या आहेत. उर्फीने देखील या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. नंतर महिला आयोगाचाही दरवाजा ठोठावला होता. सध्या उर्फीच्या पेहरावावरून राज्यात वाद सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. पण आता या वादामुळे मॉडेल उर्फीवर कोणी घर देता का घर असे म्हणण्याची वेळ आली आहे. उर्फीला मुंबईत भाड्याचे घर मिळणेही दुरापास्त झाले आहे. आपले हे दुःख उर्फीने ट्विट करून व्यक्त केले आहे.

उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. तिला धमक्या येत आहेत. तिच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप आहे. तिच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या त्रासाने कंटाळलेल्या उर्फीने महाराष्ट्र महिला आयोगाला पत्र लिहून मुंबई पोलिसांकडून संरक्षणाची मागणी केली आहे. आजकाल उर्फी जावेद राहण्यासाठी नवीन घर शोधत आहे, परंतु आपल्याला मुंबईत भाड्याने घर कोणी देत ​​नसल्याचं तिचं म्हणणं आहे.

माझ्या पेहरावामुळे मुस्लिम मालक मला घर भाड्याने देत नाहीत, मी मुस्लिम आहे म्हणून हिंदू मालकही मला घर देत नाहीत. मला मिळणाऱ्या राजकीय धमक्यांमुळे मुंबईत भाड्याने घर मिळणे अवघड झाले आहे, असे ट्विट करत उर्फी जावेदने आपले दुःख व्यक्त केले आहे.

हे ही वाचा:

लखनौमध्ये पाच मजली इमारत पत्यासारखी कोसळली .. अनेक ढिगाऱ्याखाली अडकले

अंधश्रद्धेतून सात जणांचे भयंकर हत्याकांड,

बीबीसी माहितीपटाच्या विरोधानंतर अनिल अँटनी यांचा काँग्रेसला रामराम

“जग बदलण्याची ताकद फक्त एका मतात”

उर्फी जावेदने आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, “मी मुस्लिम असल्यामुळे हिंदू जमीनदार मला भाड्याने घर देऊ इच्छित नाहीत. तोकड्या कपड्यांमुळे आणि मला राजकीय धमक्या येत असल्याने मुंबईमध्ये राहण्यासाठी कोणी घर देत. मुंबईत भाड्याने घर मिळणे अवघड आहे. उर्फीच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version