लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठ नेत्यांची बनावट व्हिडिओ प्रकरणे समोर येत आहेत.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बनावट व्हिडिओनंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा खोटा व्हिडिओ बनवल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा डीपफेक व्हिडिओ श्याम गुप्ता नावाच्या व्यक्तीने शेअर केल्याचे कळले. या प्रकरणी नोएडा एसटीएफने सायबर क्राईम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोस्ट शेअर करणाऱ्या आरोपी श्याम किशोर गुप्ता याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी नोएडा बरोला येथील रहिवासी असलेला श्याम किशोर गुप्ता याने त्याच्या एक्स हँडलवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एआय जनरेटेड डीप फेक व्हिडिओ अपलोड केला होता.या बनावट व्हिडिओमध्ये पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देत असल्याची माहिती आहे.तसेच व्हिडिओ सेंड करणाऱ्या व्यक्तीने ट्विटरवर लिहिले की, हा खरा व्हिडिओ आहे का, जर खरा असेल तर जनता आंधळी भक्त आहे.
हे ही वाचा:
दुबईला पुन्हा मुसळधार पावसाचा फटका
उद्धव ठाकरेंच्या जाहिरातीत पॉर्न स्टारची भूमिका!
अल्पवयीन हिंदू मुलीवर बलात्कार करून केले धर्मांतरण!
भारताच्या पंतप्रधानपदासाठी पाकिस्तानचा पाठिंबा राहुल गांधींना
दरम्यान, नोएडा एसटीएफचे एसीपी राजकुमार मिश्रा यांनी सांगितले की, या प्रकरणी एसटीएफकडून सायबर क्राईम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बरोला येथील रहिवासी असलेला आरोपी श्याम गुप्ता याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की हा बनावट व्हिडीओ असून तो एआय जनरेट केलेला आहे.या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.