यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा !

पूजा खेडकर प्रकरणाशी संबंध नसल्याची माहिती

यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा !

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मनोज सोनी यांचा २०२९ मध्ये कार्यकाळ संपत होता तत्पूर्वी त्यांनी राजीनामा दिला आहे. सोनी यांनी व्यक्तीगत कारणं दाखवून राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. सोनी यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला की नाही याची पुष्टी झालेली नाही.

सोनी यांच्या राजीनाम्यामुळे अनेकप्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही आयएएस अधिकारी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतानाच सोनी यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, सोनी यांच्या राजीनाम्याचा प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर प्रकरणाशी काहीही संबंध नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सोनी यांनी महिनाभरापूर्वीच आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला होता. मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारला जाईल की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

हे ही वाचा:

हवामान बदल हा कधीही स्फोट होऊ शकणारा टाईम बॉम्ब

विशाळगड हिंसाचाराशी संबंधित वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी एकाला अटक 

ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंमध्ये सशस्त्र दलातील २४ जवानांचा समावेश

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी आरोपी भावेश भिंडे विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल करणार

दरम्यान, सोनी हे २०१७ मध्ये यूपीएससीमध्ये सदस्य म्हणून आले होते. २०१७ मध्ये UPSC मध्ये नियुक्ती होण्यापूर्वी, सोनी यांनी गुजरातमधील दोन विद्यापीठांमध्ये कुलगुरू म्हणून तीन वेळा काम केले होते. २००९ ते २०१५ या कालावधीत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ (BAOU), गुजरातचे कुलगुरू म्हणून सलग दोन वेळा काम केले आहे. त्यांनी २००५ ते २००८ पर्यंत बडोदाच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही काम केले आहे.

Exit mobile version