राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात धर्मांतराचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे.एका हॉटेलमध्ये एकाच वेळी सुमारे ५०० लोकांचे धर्मांतर केले जात असल्याचे उघड झाले आहे.विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत धर्मांतराचा डाव उधळून लावला आहे.यावेळी दोन्ही गटात मोठा गदारोळ झाला आणि काही वेळातच हे प्रकरण हाणामारीत गेले.त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि लोकांनी हॉटेल सोडून पळ काढला.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी भरतपूर शहरातील अटल बंध पोलीस स्टेशन परिसरात धर्मांतराचे हे प्रकरण उघडकीस आले. येथील एका हॉटेलमध्ये सत्संगाचे आयोजन करून धर्म परिवर्तन होत होते.ख्रिश्चन धर्माच्या लोकांकडून सत्संगाच्या माध्यमातून धर्मांतर केले जात होते, असा आरोप घटनास्थळी पोहोचलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला.यामध्ये ५०० हून अधिक महिला व मुलींचा समावेश होता.
हे ही वाचा:
हमास बोगदा थेट गाझामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाखाली सापडला
ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीने ‘त्या’ विद्यार्थ्याला केले एका सत्रासाठी निलंबित
श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिरातील गाभारे १८ दिवस बंद
उत्तराखंड: हल्दवानी हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक पोलिसांच्या ताब्यात!
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल गाठले.विहिंपच्या लोकांनी घटनास्थळी दाखल होताच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि धर्मांतर करणारे लोक घटनास्थळावरून पळू लागले.विहिंपच्या लोकांनी धाव घेत १० हून अधिक जणांना पकडले. यावेळी दोन्ही गटाकडून हाणामारी झाली.दोन्ही बाजूंनी जोरदार लाथा-बुक्क्या झाल्या.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.या वेळी पोलिसांनी ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे.तसेच ५ ते ७ महिला व मुलींनाही अटक करण्यात आली आहे.पोलीस त्यांची सतत चौकशी करत आहेत.विशेष म्हणजे, आज सुमारे २० ठिकाणी धर्मांतराचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.