उत्तर प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील डॉक्टरांनी एका ३१ वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल २ किलोचा केसांचा गोळा बाहेर काढला आहे. विशेष म्हणजे, ही महिला १५ वर्षांपासून केस खात होती.
मिळालेल्या माहितीनुसार, उपचार करण्यात आलेली महिला ट्रायकोलोटोमॅनिया नावाच्या मानसिक आजाराने ग्रस्त आहे. हा आजार व्यक्तीला केस खाण्यास भाग पाडतो, त्यामुळे महिला केस खात असे. गेल्या काही वर्षांमध्ये तिच्या पोटात केस जमा झाल्यामुळे लक्षणीय अडथळे आणि तीव्र अस्वस्थता निर्माण झाली. त्यानंतर महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचार घेतले. मात्र, उपचारानंतरही महिलेला पोट दुखी पासून आराम मिळाला न्हवता.
हे ही वाचा :
सार्वजनिक आक्रोशानंतर मोस्ताकीनला अटक
मिरारोडमध्ये ख्रिश्चनांच्या कार्यक्रमात बाथ टब! सुरू होते धर्मांतरण?; बजरंग दल, विहिंपने डाव उधळला
‘महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी राबला, प्रस्थापितांना खुपला’
अखेर २२ सप्टेंबर रोजी महिलेला बरेलीतील महाराणा प्रताप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक चाचण्यांनंतर, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ एम पी सिंग आणि डॉ अंजली सोनी यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचा निर्णय घेतला.
डॉक्टरांनी महिलेवर शस्त्रक्रियाकरून तिच्या पोटातून तब्बल २ किलोचा केसाचा गोळा बाहेर काढला, ज्याने तिच्या पोटाचा महत्त्वपूर्ण भाग व्यापला होता. शस्त्रक्रियेनंतर, महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि सध्या तिच्या स्थितीची मूळ कारणे शोधण्यासाठी तिचे मनोवैज्ञानिक समुपदेशन सुरू आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, बरेलीमध्ये २५ वर्षांहून अधिक काळातील ट्रायकोलोटोमॅनिया आजाराची ही पहिलीच घटना आहे.