उमेश पाल आणि त्यांच्या दोन आंगरक्षकांना दिवसाढवळ्या गोळ्या घालून आणि बॉम्ब टाकून हत्या करणारा माफिया अतिक अहमदचा मुलगा असद अहमद आणि शुटर गुलाम हसनचा एनकाउंटर करणाऱ्या एसटीएफ टीमला ‘राष्ट्रपती शौर्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या एनकाउंटरचे नेतृत्व प्रयागराज एसटीएफचे तत्कालीन डेप्युटी एसपी नवेंदू सिंग यांनी केले होते.
एसपी नवेंदू सिंग यांना चौथ्यांदा ‘शौर्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. याआधी त्यांना तीन वेळा सन्मानित करण्यात आले होते. असद अहमद आणि शुटर गुलाम हसन या दोघांचा एनकाउंटर एसटीएफने झाशीमध्ये केला होता. या पथकात एकूण १७ सदस्यांचा समावेश होता. या सर्व सदस्यांना शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. बऱ्याच कालावधीनंतर यूपी पोलिसांना हा पुरस्कार मिळणार आहे.
हे ही वाचा:
एस.टी.महामंडळ नफ्याच्या उंबरठ्यावर !
बांगलादेशमध्ये हिंदुंवरील अत्याचाराबद्द्ल रिपब्लिकन नेत्याने केला निषेध
पश्चिम बंगालमधील बलात्काराबद्दलचा प्रश्न महुआ मोईत्रांना झोंबला, अजित अंजुमना केले ब्लॉक
१३ एप्रिल रोजी झाशीच्या बारागाव पोलीस स्टेशन हद्दीतील परिछा धरणाजवळ झालेल्या चकमकीत एसटीएफने असद आणि गुलाम या दोघांना ठार केले होते. त्यावेळी या दोघांकडून एक अत्याधुनिक ब्रिटीश बुलडॉग रिव्हॉल्व्हर आणि पी-८८ वाल्थर पिस्तूलही जप्त करण्यात आले होते. दरम्यान, २४ फेब्रुवारी उमेश पाल यांची त्यांच्या घराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. असद अहमद आणि गुलाम हसन दोघेही उमेश पाल यांच्यावर गोळ्या घालताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते.