उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.आतापर्यंत १० जणांची सुटका करून त्यांना कारखान्यातून बाहेर काढण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
कौशांबी जिल्ह्यातील कोखराज पोलीस ठाण्याच्या भारवारी शहरात ही घटना घडली. फटाक्यांच्या कारखान्यात अजूनही स्फोट होत आहेत. कारखान्यात सुमारे ८ लोक अजूनही अडकले असल्याची माहिती आहे.या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी यांना मिळताच त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.दरम्यान, एसपीने जारी केलेल्या निवेदनात या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा:
महिनाभरात रामलल्लाच्या चरणी २५ किलो सोने, चांदीचे दागिने अर्पण
पुढील तीन महिने ‘मन की बात’ ला सुट्टी
राष्ट्रध्वजाला म्हटले ‘सैतानी’; फ्रान्सने केले मुस्लिम धर्मगुरूला हद्दपार
अशोक चव्हाण कामाला लागले; तब्बल ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश!
एसपी ब्रिजेश श्रीवास्तव यांच्यासह अनेक पोलिस घटनास्थळी उपस्थित आहेत.स्थानिक लोकांनी सांगितल्यानुसार, फटाक्यांच्या कारखान्यात झालेला स्फोट इतका भीषण होता की फटाक्यांचे तुकडे कित्येक किलोमीटर दूर उडून गेले.स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.हा कारखाना प्रयागराज-कानपूर हायवेजवळ आहे.मीडियाच्या बातमीनुसार, हा कारखाना कौशल अली नामक व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती आहे.