उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात पहाटे चारच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. फिरोजपूरहून धनबादला जाणाऱ्या ‘किसान एक्स्प्रेस’चे डबे अचानक वेगळे होवून एक्सप्रेसची दोन गटात विभागणी झाली. रायपुर रेल्वे फाटकाजवळ ही घटना घडली. दरम्यान, तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघाताच्या कारणांचा रेल्वे विभाग तपास करत आहे.
किसान एक्स्प्रेसला एकूण २१ डबे होते, अपघातानंतर ८ डबे वेगळे होवून स्योहारा रेल्वे स्टेशनवर पोहोचले तर उर्वरित १३ डबे रायपुर रेल्वे फाटकाजवळ राहिले. अचानक रेल्वेचे डबे वेगळे झाल्याची बातमी प्रवाशांना मिळताच एकच खळबळ माजली. दरम्यान, या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रायपुर रेल्वे फाटकाजवळ थांबलेल्या १३ डब्यांना पॉवर इंजिनद्वारे खेचून स्योहारा रेल्वे स्टेशनवर आणण्यात आले असून ते रेल्वेला जोडण्याचे काम सुरु आहे. रेल्वेतील बहुतांश प्रवासी हे युपी पोलीस भरतीची परीक्षा देणारे होते. यांच्यासाठी प्रशासनाने सुमारे चार रोडवेज बसेस रायपूर रेल्वे गेटवर तैनात करून त्या त्यांच्या इच्छित स्थळी रवाना केल्या आहेत.
हे ही वाचा :
बलुचिस्तानमधील बाजारपेठेत बॉम्बस्फोट; दोन मुलांसह महिला ठार
कोलकाता : हॉस्पिटलच्या माजी प्राचार्याच्या घरी सीबीआयचा छापा !
टेलिग्रामचे संस्थापक पावेल डुरोव यांना अटक
“मविआचे सरकार गडगडायला नाना पटोले जबाबदार”
दरम्यान, किसान एक्स्प्रेस दोन विभागात विभागल्याने अनेक गाड्यांवर तासंतास परिणाम झाला. पंजाब मेल धामपूर रेल्वे स्थानकावर सुमारे दोन तास उभी होती.