सिंगापूर एअरलाइन्सचा पायलट म्हणून तोतयागिरी करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला निमलष्करी दलाने गुरुवारी(२५ एप्रिल) दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले.
संगीत सिंग असे तोतया पायलटचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, संगीत सिंग हा पायलटचा गणवेश परिधान करून विमानतळाच्या मेट्रो स्कायवॉक परिसरात फिरत होता.तेव्हा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (CISF) त्याच्यावर नजर गेली.सुरक्षा दलाने त्याची चौकशी केली असता त्याने स्वत:ला सिंगापूर एअरलाइन्सचा कर्मचारी असल्याचे दाखवून गळ्यात ओळखपत्र घातले.
हे ही वाचा:
बॅलेट पेपर नाही; ईव्हीएमवरच होणार निवडणुका!
‘ममता बॅनर्जींवर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करा’
हॉर्लिक्स आता आरोग्यदायी पेय नाही; ‘फंक्शनल न्यूट्रिशनल ड्रिंक’ म्हणून नोंद!
तथापि, सुरक्षा दलाने त्याच्या कागदपत्रांची तपासणी केली असता त्याने दाखवलेले ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले.यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याची चौकशी करण्यात आली.बिझनेस कार्ड मेकर या ऑनलाइन ॲपचा वापर करून सिंगापूर एअरलाइन्स कर्मचाऱ्याचे ओळखपत्र काढल्याचे त्याने सांगितले.द्वारका येथून पायलटचा गणवेश खरेदी केल्याचे त्याने उघड केले.
पुढील चौकशीत उघड झाले की, संगीत सिंग याने २०२० मध्ये मुंबईत एक वर्षाचा एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी कोर्स पूर्ण केला होता.यानंतर सिंगापूर एअरलाइन्सचा पायलट म्हणून कुटुंबीयांची दिशाभूल करत होता.दरम्यान, तोतया पायलटला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.