फेसबुकवर ओळख, प्रियसीला भेण्यासाठी युपीच्या तरुणाने ओलांडली पाकिस्तानची सीमा, झाली अटक!

न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

फेसबुकवर ओळख, प्रियसीला भेण्यासाठी युपीच्या तरुणाने ओलांडली पाकिस्तानची सीमा, झाली अटक!

उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातील एका व्यक्तीला बेकायदेशीरपणे सीमा ओलांडल्याबद्दल पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. बादल बाबू असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो नागला खटकरी गावचा रहिवासी आहे. पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांनी मंडी बहाउद्दीन शहरात त्याला अटक केली.

पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्याकडे प्रवासाची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. मात्र, त्याच्याकडे कोणतेही कागदपत्रे नसल्याने २७ डिसेंबर रोजी त्याला अटक करण्यात आले. त्याच्यावर पाकिस्तानच्या विदेशी कायदा, १९४६ च्या कलम १३ आणि १४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तो १० जानेवारी २०२५ रोजी पुन्हा हजर होणार आहे. सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की, बादल बाबूने यापूर्वी दोनदा भारत-पाकिस्तान सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो अयशस्वी झाला. त्याच्या तिसऱ्या प्रयत्नात, तो यशस्वीपणे पाकिस्तानात गेला आणि मंडी बहाउद्दीनला पोहोचला. याठिकाणी फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेला भेटला.

हे ही वाचा : 

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधान्याने पूर्ण करणार

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० च्या प्रकल्पास गती द्यावी!

मुस्लिमांनी फेकलेले दगड, विटा स्वसंरक्षणार्थ!

मणिपूर हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मागितली माफी

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले की, बाबूने चौकशीदरम्यान कबूल केले की त्याने सोशल मीडियावर महिलेशी प्रेमसंबंध विकसित केले होते आणि तिला प्रत्यक्ष भेटण्यासाठी हताश होऊन वैध व्हिसा किंवा प्रवासी कागदपत्रांशिवाय देशात प्रवेश केला होता.

दरम्यान, फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेला भेटण्यासाठी बाबूने पाकिस्तानात प्रवेश केला आहे का? किंवा इतर काही कारणे आहेत, याचा अधिकारी आता तपास करत आहेत. भारतीय व्यक्तीने पाकिस्तानात जाऊन आपल्या साथीदाराला भेटण्यासाठी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.

 

Exit mobile version