माजी सपा आमदार आरिफ हाश्मी यांच्यावर ईडीची कारवाई, ८.२४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!

बेकायदेशीर अतिक्रमण, जमीन बळकावल्याचा आरोप

माजी सपा आमदार आरिफ हाश्मी यांच्यावर ईडीची कारवाई, ८.२४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!

समाजवादी पक्षाचे माजी आमदार आरिफ अन्वर हाश्मी यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी (२४ सप्टेंबर) एजन्सीने हाश्मी आणि त्याची पत्नी रोझी सलमा यांच्या मालकीची ८.२४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये घर, शेती व व्यावसायिक जमीन आहे. ईडीने एकूण २१ स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.

आरिफ अन्वर हाश्मी व त्याचा भाऊ आणि साथीदारांविरुद्ध गुन्हेगारी कट, फसवणूक अशा प्रकारचे अनेक एफआयआर त्यांच्यावर दाखल आहेत. याच एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे आरिफ अन्वर हाश्मी याला यूपी गँगस्टर कायद्यांतर्गत गुंड घोषित करण्यात आले आहे. याच्यावर बेकायदेशीर अतिक्रमण आणि जमीन बळकावल्याचाही आरोप आहे.

आरिफ अन्वर हाश्मी १९८४ पासून बेकायदेशीर अतिक्रमण आणि जमीन बळकावण्याच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. ईडीच्या तपासात जमिनीच्या नोंदीशी संबंधित सरकारी कागदपत्रांमध्ये छेडछाड झाल्याचेही समोर आले आहे. यासह अन्य मार्गाने अवैध पैसे कमावल्याची अनेक प्रकरणे तपासात उघडकीस आली आहेत. ईडीने जुलै २०२४ मध्ये माजी आमदारावर पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

हे ही वाचा : 

उर्दूचा आग्रह करणाऱ्या कर्नाटक सरकारवर भाजपचा प्रहार

मनोज जरांगे उपोषण सोडणार, समाजाने सांगितले की, आणखी काही कारण?

पंतप्रधानांची फेसबुकवर पोस्ट शेअर केल्याने कट्टरपंथीयांकडून तिघांचे अपहरण करत मारहाण!

भारताची ‘पॉवर’; जपानला टाकले मागे

दरम्यान, लखनौच्या ईडी पथकाने कारवाई करत आरिफ अन्वरची ८ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली  आहेत. यामध्ये आरिफ अन्वरसह त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या लखनौ, बलरामपूर आणि गोंडा (उत्तर प्रदेश) येथील २१ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत.

Exit mobile version