29 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषकारमधील एअरबॅग 'गहाळ' केल्याप्रकरणी आनंद महिंद्रा आणि अन्य १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल...

कारमधील एअरबॅग ‘गहाळ’ केल्याप्रकरणी आनंद महिंद्रा आणि अन्य १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

कारच्या सुरक्षेबाबत महिंद्रा कंपनीकडून 'खोटे आश्वासन', तक्रारदार

Google News Follow

Related

२०२० मध्ये उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एअरबॅगशिवाय स्कॉर्पिओ विकल्याप्रकरणी उद्योगपती आनंद महिंद्रा आणि अन्य १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारच्या सुरक्षेबाबत “खोटे आश्वासन” दिल्याबद्दल आनंद महिंद्रा आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या १२ कर्मचार्‍यांवर शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार, राजेश मिश्रा यांनी आरोप केला आहे की, महिंद्रा कंपनीने मला एअरबॅग नसलेली स्कॉर्पिओ कार विकली, त्यामुळे माझ्या मुलाचा कार अपघातात मृत्यू झाला.

राजेश मिश्रा यांनी २०२० मध्ये आपला मुलगा अपूर्वसाठी भेट म्हणून १७.३९ लाख रुपयांना काळी स्कॉर्पिओ खरेदी केली होती.त्यानंतर १४ जानेवारी २०२२ रोजी अपूर्व आपल्या मित्रांसोबत लखनौहून कानपूरला येत असताना प्रचंड धुक्यामुळे स्कॉर्पिओ कार दुभाजकाला धडकली आणि उलटली त्यात अपूर्वचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा:

भारतीय वायुदलात ‘सी-२९५’ वाहतूक विमान दाखल!

पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त !

किरीट सोमय्यांना कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

नरेंद्र मोदींनी बाईक बंद करायला सांगितली तरच करणार!

एफआयआरमध्ये तक्रारदाराने म्हटले आहे की, अपघातादरम्यान सीटबेल्ट बांधला असूनही एअरबॅग उघड झाली नाही.कंपनीने खोटे आश्वासन देऊन आपली फसवणूक केल्याचे राजेश मिश्रा यांनी तक्रारीत म्हटले आहे.गाडीची नीट तपासणी केली असती तर माझ्या मुलाचा मृत्यू झाला नसता, असे सांगत राजेशने कंपनीवर फसवणूक केल्याचा आरोप केला.अपघातानंतर राजेश मिश्रा यांनी २९ जानेवारी रोजी स्कॉर्पिओ खरेदी केलेल्या स्टोअरमध्ये चौकशी करण्यासाठी पोहचले.

गाडीच्या स्टोअरमध्ये चौकशी करण्यासाठी गेलो असता कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी माझ्याशी वाद घालायला सुरुवात केली.तसेच स्टोअर संचालकांच्या सूचनेनुसार व्यवस्थापकांनी मला आणि त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप त्यांनी केला.अपघातानंतर स्कॉर्पिओ कानपूरमधील रुमा येथील महिंद्रा कंपनीच्या शोरूममध्ये नेण्यात आली.कंपनीने वाहनात एअरबॅग लावल्या नसल्याचं तक्रादाराने सांगितले आहे.

अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नसून, मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), २८७ (यंत्रसामग्रीच्या बाबतीत निष्काळजी वर्तन), ३०४-A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि आणखी अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा