उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातून एक विचित्र अशी घटना समोर आली आहे. एका लग्नादरम्यान वराला टक्कल असल्याचे समजताच वधूने लग्न करण्यास नकार दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. लग्नाच्या अर्ध्या विधी संपन्न झाल्या असताना वधूला ही माहिती कळताच तिने लग्न करण्यास नकार दिला आहे.
एका लग्नाचे काही विधी संध्याकाळी पूर्ण झाले आणि उर्वरित विधी दुसऱ्या दिवशी पूर्ण होणार होते. दरम्यान वराला, मंडपात जाण्यापूर्वी चक्कर आणि तो बेशुद्ध पडला. यावेळी त्याचा डोक्याचा विग खाली पडला आणि वराला टक्कल असल्याचे लक्षात आले. वराला टक्कल पडल्याचे समजल्यानंतर वधूने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला.
वराने आणि त्याच्या कुटुंबीयाने वधूला आणि वधूच्या कुटुंबाला त्याच्या टक्कल पडण्याबाबत काहीही सांगितलेले नव्हते. त्यामुळे तिने लग्न करण्यास नकार दिला. वधूच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी वधूला मनवण्याचा प्रयत्न केला मात्र, वधू आपल्या मतावर ठाम राहिली. त्यानंतर हे प्रकरण स्थानिक पोलिस ठाण्यात नेण्यात आले, मात्र पोलिसांच्या मध्यस्थी नंतरही वधू ठाम राहिली.
हे ही वाचा:
एटीएसची पुण्यात मोठी कारवाई, एका तरुणाला अटक
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार
आशा भोसले म्हणतात, पिझ्झा खाण्यापेक्षा भाकरी खा!
‘यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचा उजवा हात’
वधूच्या काकांनी सांगितले की, वराच्या कुटुंबाने त्याला टक्कल असल्याची वस्तुस्थिती लपवायला नको होती. जर त्यांनी वराच्या टक्कल पडल्याबद्दल आम्हाला आधीच सांगितले असते, तर आम्ही वधूला मानसिकदृष्ट्या तयार करू शकलो असतो आणि तिला धक्का बसला नसता. खोट्याच्या आधारावर लग्नाची अपेक्षा ठेवू शकत नाही.”